नागपूर : धावत्या शिवशाही बसने अचानक घेतला पेट

1943

– प्रवासी सुखरूप
The गडविश्व
नागपूर, ४ एप्रिल : धावत्या शिवशाही बसने अचानक पेट घेतल्याची घटना नागपूर-अमरावती मार्गावर घडल्याची बाबा समोर येत आहे. या बसमध्ये १६ प्रवासी होते मात्र सर्व प्रवासी सुखरूप आहेत.
नागपूरवरून अमरावतीकडे १६ प्रवासी घेऊन शिवशाही बस जात होती. दरम्यान कोंढाळी परिसरात असलेल्या साईबाबा मंदिराजवळ अचानक या बसला आग लागली. आग लागल्यामुळे बस जळून खाक झाली असून बसचे मोठे नुकसान झाले आहे. शॉर्ट सर्किटमुळे या बसला आग लागल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविला जात आहे. या घटनेमुळे चांगलाच गोंधळ उडाला. मात्र प्रसंगावधान राखत प्रवासी खाली उतरल्याने मोठी दुर्घटना टळली आहे. या घटनेने पुन्हा एकदा शिवशाही बसच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहे.

(The gadvishva) (nagpur news) (Nagpur: A running Shivshahi bus burst into flames)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here