कोरची : ४५ हजारांचा अवैध विदेशी दारूसाठा जप्त

61

कोरची : ४५ हजारांचा अवैध अवैध विदेशी दारूसाठा जप्त
The गडविश्व
ता.प्र / कोरची, दि. १४ : गडचिरोली जिल्ह्यात दारूबंदी असतानाही अवैधरित्या विदेशी दारू साठवून विक्री करण्याचा प्रयत्न उघडकीस आला आहे. कोरची तालुक्यातील कोटगुल पोलिसांनी ढोलडोंगरी येथे कारवाई करत अनिल रामलाल जनबंधू (वय ४५) यांच्या राहत्या घरातून सुमारे ४५ हजार रुपये किमतीची विदेशी दारू जप्त केली.
१४ जानेवारी २०२६ रोजी सकाळी मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी घरझडती घेतली असता, बैठक खोलीतून गोवा व्हिस्कीचे १८० एम.एल. क्षमतेचे ३०० निपा आढळून आले. आरोपीकडे कोणताही परवाना नसताना हा साठा विक्रीच्या उद्देशाने ठेवण्यात आला होता.
या प्रकरणी महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम ६५(ई) अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला असून पुढील तपास कोटगुल पोलीस करीत आहेत.
#thegdv #thegadvishva #gadchirolinews #gadchirolipolice #korchi #crimenews

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here