गडचिरोलीत २१ पासून जेईई परीक्षा : २०० मीटर परिसरात निर्बंध लागू

54

गडचिरोलीत २१ पासून जेईई परीक्षा : २०० मीटर परिसरात निर्बंध लागू
The गडविश्व
गडचिरोली, दि. १६ : राष्ट्रीय परीक्षा संस्था, नवी दिल्ली यांच्या वतीने घेण्यात येणारी जेईई मेन २०२६ परीक्षा गडचिरोलीतील शासकीय विज्ञान महाविद्यालय, चामोर्शी रोड येथे आयोजित करण्यात आली आहे. परीक्षा दि. २१, २२, २३, २४ व २८ जानेवारी रोजी सकाळी ९ ते दुपारी १२ व दुपारी ३ ते सायंकाळी ६ या सत्रांत, तर दि. २९ जानेवारी रोजी सकाळी ९ ते दुपारी १२.३० या वेळेत होणार आहे.
परीक्षा शांत व सुरक्षित वातावरणात पार पडावी यासाठी जिल्हादंडाधिकारी अविश्यांत पंडा यांनी कलम १६३ अन्वये परीक्षा केंद्राच्या २०० मीटर परिसरात मनाई आदेश जारी केला आहे.
या कालावधीत केंद्र परिसरात मोबाईल, कॅमेरा व इतर इलेक्ट्रॉनिक उपकरणांवर बंदी, तसेच नारेबाजी, भाषणे, वाद्यवाजविणे व पाचपेक्षा अधिक व्यक्तींचा जमाव प्रतिबंधित राहील. शस्त्रे, दाहक व स्फोटक पदार्थ बाळगण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे.
मनाई आदेश परीक्षेच्या दिवशी सकाळी ७ ते रात्री ८ वाजेपर्यंत लागू राहील. आदेशाचे उल्लंघन केल्यास कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे.
#thegdv #thegadvishva #gadchirolinews #gadchirolipolice #JEEExam #JEEMain2026 #ExamAlert #Gadchiroli #ExamSecurity #Section163 #ProhibitoryOrders #ExamCenter #StudentAlert #PublicNotice

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here