The गडविश्व
ता. प्र / धानोरा, ९ ऑक्टोबर : नव्या शैक्षणिक वर्षाला सुरुवात झाली असून शाळा सुरू होवून चार महिने उलटून गेले परंतु ब्रम्हपुरी-आरमोरी-धानोरा मार्गाने ब्रम्हपुरी डेपोची बस सुरू न झाल्याने हि बस पुर्ववत सुरू करण्याची मागणी परिसरातील लोकांनी आणि शालेय विद्यार्थ्यांच्या पालकांनी केली आहे.
एस. टी. महामंडळ कर्मचाऱ्यांच्या संप काळात धानोरा-आरमोरी-ब्रम्हपुरी बंद केल्या पासून आजपर्यंत हि बंद केलेली बस पुर्ववत करण्याची मागणी करण्यात येत आहे.
बंद करण्यात आलेल्या गाडीला वर्ष उलटले मात्र बारा महिन्यांचा कालखंड उलटुनही बंद केलेली एस.टी महामंडळ ची सेवा सुरू करण्यात न आल्याने धानोरा, मोहली येथे शिक्षण घेण्यासाठी येजा करणाऱ्या मुलामुलींना शिक्षणापासुन वंचित रहावे लागत आहे.
रा़ंगी परिसरातील नागरिकांना तसेच शालेय विद्यार्थ्यांना आरमोरी येथे ये जा करण्यास मोठी अडचण निर्माण होत आहे. शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना ये जा करण्यासाठी हीच बस महत्त्वाची आहे. त्यामुळे सदर बस पुरवत करून विद्यार्थ्यांची व नागरिकांची होणारी गैरसोय थांबण्याची मागणी विद्यार्थ्यांच्या पालकांनी व नागरिकांनी केली आहे.
हि बस सकाळी साडेआठ वाजता ब्रह्मपुरी येथून सुटायची व दहा वाजता रांगीला पोहचत असे. रांगीवरून याच बसणे अनेक मुले मुली व धानोरा येथे शिक्षण घेण्यासाठी जायचे परत चार वाजता हि बस रांगी येथे यायची परंतु ही बस बंद झाल्याने विद्यार्थ्यांची मोठी गैरसोय होत आहे. वारंवार मागणी करूनही परिवहन विभागाच्या अधिकाऱ्यांचे या मागणी कडे सर्रास दुर्लक्ष होत असल्याने नागरिकांना कमालीचा मनस्ताप त्रास सहन करावा लागत आहे. धानोरा, मोहलि, चिंगलि, महावाडा, कन्हाळगाव, रांगी, कोरेगाव, विहिरगाव येथिल परिसरातील नागरिकांना, विद्यार्थ्यांना, इतर प्रवाशांना या मार्गाने ये जा करण्यासाठी कोणतेही साधन नाही व प्रवासी वाहने चालत नसल्याने नागरिकांची मोठी फजीती होत आहे. गेल्या बारा महिन्यांपासून ब्रह्मपुरी आगाराची एसटी बस सेवा बंद आहे. एसटी कर्मचाऱ्यांच्या संपापूर्वी ही बस ब्रह्मपुरी येथून सकाळी साडेआठ वाजता सुटत होती. दिवसभराचे आपल्या नेहमीच दोन फेऱ्या करून सायंकाळी ब्रम्हपुरी आगारात पोहोचत होती. परंतु सध्या ही बस बंदच असल्याने नागरिकांची आणि विद्यार्थ्यांची गैरसोय होत आहे .त्यामुळे ही बस पूर्ववत सुरू करण्यात यावी अशी मागणी नागरिक करित आहेत.