गारपिटीचा कहर :पिसेवडधा परिसरातील मका-धान पिकांचे मोठे नुकसान, शेतकरी अडचणीत
The गडविश्व
ता. प्र/धानोरा, दि. २८ : धानोरा तालुक्यालगत असलेल्या आरमोरी तालुक्यातील पिसेवडधा परिसराला २७ मार्च २०२६ रोजी अवकाळी पावसाने अक्षरशः झोडपून काढले. अचानक आलेल्या पाऊस, वादळी वारे आणि गारपिटीमुळे परिसरातील अनेक गावांतील शेतकऱ्यांचे मका व धान पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
रांगीपासून सुमारे ७ कि.मी. अंतरावर असलेल्या या भागात अवकाळी हवामानाचा मोठा फटका बसला. गारपिटीमुळे उभ्या पिकांचे मोठे नुकसान होऊन शेतकरी बांधव आर्थिक संकटात सापडले आहेत. अनेक ठिकाणी मका पिके जमिनीवर कोसळली असून धान पिकांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे चित्र आहे.
अचानक आलेल्या या नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले असून शासनाने तात्काळ नुकसानग्रस्त भागांचा पंचनामा करून शेतकऱ्यांना योग्य ती आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी पिसेवडधा परिसरातील शेतकरी बांधवांकडून जोर धरत आहे.
दरम्यान, प्रशासनाने त्वरीत दखल घेऊन मदतीचे हात पुढे करावेत, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
#thegdv #thegadvishva #gadchirolinews #gadchirolipolice














