गडचिरोली पोलीस भरतीची लेखी परीक्षा जाहीर ; 18 व 22 मार्चला उमेदवारांची कसोटी

92

गडचिरोली पोलीस भरतीची लेखी परीक्षा जाहीर ; 18 व 22 मार्चला उमेदवारांची कसोटी
The गडविश्व
गडचिरोली, दि.१४ : गडचिरोली जिल्हा पोलीस दलामार्फत पोलीस शिपाई व चालक पोलीस शिपाई भरती 2024-25 (प्रत्यक्ष भरती 2026) साठी अर्ज केलेल्या उमेदवारांसाठी महत्त्वाची सूचना जारी करण्यात आली आहे. या भरती प्रक्रियेअंतर्गत घेण्यात येणाऱ्या लेखी परीक्षांच्या तारखा निश्चित करण्यात आल्या आहेत.
चालक पोलीस शिपाई पदासाठीची लेखी परीक्षा 18 मार्च 2026 रोजी तर पोलीस शिपाई पदासाठीची लेखी परीक्षा 22 मार्च 2026 रोजी आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती पोलीस प्रशासनाने दिली आहे.
सदर परीक्षेसाठीचे हॉल तिकीट उमेदवारांना महाआयटी (MahaIT) पोर्टलवरून उपलब्ध होणार असून उमेदवारांनी वेळेत ते डाउनलोड करून घ्यावेत, असे आवाहन करण्यात आले आहे.
दरम्यान, भरती प्रक्रियेदरम्यान कोणत्याही प्रकारच्या आमिष किंवा प्रलोभनांना बळी पडू नये, असेही पोलीस प्रशासनाने स्पष्ट केले आहे. जर कोणी व्यक्ती किंवा संस्था नोकरी मिळवून देण्याचे आमिष दाखवत असेल, तर त्याची माहिती तात्काळ पोलीस अधीक्षक कार्यालय, गडचिरोली येथील समाधान कक्ष येथे द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
यासंदर्भात अधिक माहितीसाठी 8806312100 या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
#thegdv #thegadvishva #gadchirolinews #gadchirolipolice #policebharti2025_2026 #policerecrutment #gadchirolipolicerecrutment

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here