गडचिरोली : पोलीस दलाची करीत होता रेकी, आणखी एका नक्षलीस केली अटक

1221

– टिटोळा येथील पोलीस पाटीलाच्या हत्येत प्रत्यक्ष सहभाग
– शासनाने जाहीर केले होते एकुण दीड लाख रुपयांचे बक्षीस
The गडविश्व
गडचिरोली, दि.१० : गटटा (जां.) पोलीस स्टेशन हददीत गटटा नाल्याजवळ पोस्टे गटटा (जां.) पोलीस पार्टीच्या हालचालींबाबतची माहीती देण्याच्या उद्देशाने फिरत असल्याच्या मिळालेल्या गोपनिय माहीतीच्या आधारे विशेष अभियान पथकाचे जवान आणि पोस्टे गटटा (जां.) पोलीस पार्टीच्या जवानांनी माओवाद विरोधी अभियान राबवून दीड लाख रुपयांचे बक्षीस असलेल्या नक्षलीस ०९ डिसेंबर रोजी अटक केली आहे. अर्जुन सम्मा हिचामी, (वय १९) , रा. झारेवाडा, ता. एटापल्ली, जि.गडचिरोली असे अटक करण्यात आलेल्या नक्षलीचे नाव आहे.
०२ ते ०८ डिसेंबर रोजी दरम्यान माओवादी हे पीएलजीए सप्ताह साजरा करतात. या दरम्यान ते सरकारी मालमत्तेचे नुकसान करणे, पोलीस दलावर हल्ले करुन त्यांच्या जवळील शस्त्रे लुटून नेणे, रस्ते व इतर प्रकारच्या सरकारी कामात अडथळा आणून जाळपोळ करणे इ. देशविघातक कृत्य करत असतात. २३ नोव्हेंबर २०२३ रोजी टिटोळा ता.एटापल्ली जि.गडचिरोली येथील पोलीस पाटील लालसु वेळदा यांचे हत्येमध्ये त्याचा प्रत्यक्ष सहभाग होत
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सदर घटनेच्या काही दिवसापुर्वी त्याने आपली माहीती आणि ठावठिकाणा हा माओवादयांना सांगितला होता. तसेच पोस्टे गट्टा(जां.),हेडरी,आणि सुरजागड भागातील सुरक्षा जवानांच्या हालचालींवर तो बारिक लक्ष ठेवुन होता. तसेच या वर्षाच्या फेब्रुवारीच्या उत्तरार्धात व मार्च महिन्याच्या सुरुवातीला विसामुंडी आणि अलेंगा येथील बांधकाम उपकरणांच्या जाळपोळ प्रकरणातही त्याचा सक्रीय सहभाग होता.
त्यास पोस्टे गटटा (जां.) ता,एटापली जि. गडचिरोली येथे दाखल अप. क्र. 76/2023 कलम 302,36ड 4,143,147,148,149,120-ब भादवी, 3/25 भारतीय हत्यार कायदा, 135 महाराष्ट्र पोलीस कायदा अन्वये गुन्ह्रात अटक करण्यात आलेली आहे तसेच टिटोळा ता.एटापल्ली जि.गडचिरोली येथील पोलीस पाटलाच्या हत्येमघ्ये अटक करण्यात आलेला तो पहिला आरोपी आहे.
तो २०२१ पासुन झारेवाडा आणि आजुबाजुच्या भागात कार्यरत जनमिलीशिया म्हणुन सक्रीय होता. येत्या काही दिवसात पेरमिली दलममध्ये सदस्य पदावर सामील होण्याची त्याची योजना होती.
त्याने आपल्या कार्यकाळात ०२ जाळपोळ त्यामध्ये फेब्रुवारी २०२२ मध्ये विसामुंडी गावात झालेल्या जाळपोळीमध्ये सहभाग, मार्च २०२३ मध्ये अलेंगा-पुरसाळगोंडी गावात झालेल्या जाळपोळीमध्ये सहभाग तसेच नोव्हेंबर २०२३ रोजी टिटोळा गावातील पोलीस पाटील लालसु टिंगरा वेळदा या निरपराध इसमाच्या हत्येमध्ये सहभाग. महाराष्ट्र शासनाने त्याच्या अटकेवर दीड लाख रूपयाचे बक्षीस जाहिर केले होते.
गडचिरोली पोलीस दलाच्या प्रभावी कारवाईमुळे माहे जानेवारी 2022 ते आतापर्यंत एकुण 73 माओवाद्यांना अटक करण्यात गडचिरोली पोलीस दलास यश आलेले आहे. सदरची कारवाई पोलीस अधीक्षक नीलोत्पल सा., अपर पोलीस अधीक्षक (अभियान) यतिश देशमुख सा., अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) कुमार चिंता सा., अपर पोलीस अधीक्षक, अहेरी एम. रमेश सा. यांचे मार्गदर्शनाखाली पार पडली. तसेच पोलीस अधीक्षक यांनी माओवाद्यांना माओवादाची हिंसक वाट सोडुन आत्मसमर्पण करुन सन्मानाने जीवन जगण्याचे आवाहन केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here