गडचिरोली : भरधाव ट्रॅक्टरच्या धडकेत ई-रिक्षा चालक जागीच ठार

29

गडचिरोली : भरधाव ट्रॅक्टरच्या धडकेत ई-रिक्षा चालक जागीच ठार
The गडविश्व
गडचिरोली, दि. २४ : पोर्ला बसस्थानक परिसरात सोमवारी सकाळी सुमारे १० वाजण्याच्या सुमारास घडलेल्या भीषण अपघातात ई-रिक्षा चालकाचा जागीच मृत्यू झाला. या घटनेने परिसरात मोठी खळबळ उडाली असून नागरिकांत हळहळ व्यक्त होत आहे.
मृतक गजानन श्रीहरी गुरनुले (वय ५२, रा. अंतरजी) हे आपल्या ई-रिक्षासह प्रवाशांच्या प्रतीक्षेत उभे असताना त्याचवेळी सुधीर अशोक टेंभुर्णे (वय ४३) हा आपल्या ताब्यातील ट्रॅक्टर भरधाव वेगाने व निष्काळजीपणे त्यांच्या वाहनाला जोरदार धडक दिली. धडकेनंतर ते खाली पडले आणि ट्रॅक्टरचे चाक अंगावरून गेल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा करून पुढील तपास सुरू केला आहे. संबंधित ट्रॅक्टर चालकाविरुद्ध निष्काळजीपणे वाहन चालविल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
या दुर्दैवी घटनेमुळे पोर्ला परिसरात शोककळा पसरली असून मृतकाच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
#thegdv #thegadvishva #gadchirolinews #gadchirolipolice #accident

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here