‘मलेरियाला हद्दपार करू’; आलदंडीत नागरिकांची आरोग्य विभागासोबत सामूहिक शपथ

4

‘मलेरियाला हद्दपार करू’; आलदंडीत नागरिकांची आरोग्य विभागासोबत सामूहिक शपथ
– मलेरिया प्रतिबंधासह कुष्ठरोगाबाबतही जनजागृती; लाहेरी आरोग्य केंद्राच्या फोकल राऊंडदरम्यान नागरिकांना मार्गदर्शन
The गडविश्व
भामरागड, दि. ०४ : तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र लाहेरी अंतर्गत मलेरिया प्रतिबंध आणि नियंत्रणासाठी फोकल राऊंड राबविण्यात आला. यावेळी आलदंडी गावात नागरिकांना एकत्र करून मलेरियापासून बचावाच्या उपाययोजनांबाबत जनजागृती करण्यात आली. तसेच ‘मलेरियाला हद्दपार करू’ असा निर्धार करत नागरिकांनी आरोग्य विभागासोबत सामूहिक शपथ घेतली.
फोकल राऊंडदरम्यान गावात सुरू असलेल्या डास प्रतिबंधक फवारणीच्या कामाची पाहणी करण्यात आली. शासनाकडून उपलब्ध करून देण्यात आलेल्या मच्छरदाणीचा नियमित वापर करणे, घर परिसरात फवारणी करून घेणे आणि डासांची उत्पत्ती रोखण्यासाठी आवश्यक खबरदारी घेण्याचे आवाहन नागरिकांना करण्यात आले.
यावेळी थंडी वाजून ताप येणे, डोके दुखणे, अंग दुखणे यांसारखी मलेरियाची लक्षणे आढळल्यास विलंब न करता गावातील आशा स्वयंसेविकेमार्फत रक्ताचा नमुना तपासून घ्यावा, असे मार्गदर्शन करण्यात आले. रक्त तपासणीत मलेरियाचे निदान झाल्यास तात्काळ उपचार घेण्याचे आवाहनही करण्यात आले.

आरोग्य विभागाच्या पथकाकडून मलेरियासोबतच कुष्ठरोगाच्या प्रतिबंध, लक्षणे आणि वेळेत तपासणी-उपचाराचे महत्त्व याबाबतही नागरिकांना मार्गदर्शन करण्यात आले. कोणत्याही आजाराची लक्षणे आढळल्यास ती लपवून न ठेवता आरोग्य यंत्रणेशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले.
या उपक्रमात जिल्हा व्हीबीडी सल्लागार राजेश कार्लेकर, कुष्ठरोग पर्यवेक्षक प्रकाश गवारे, टीसीआय फाउंडेशनचे समन्वयक संतोष झाडे व त्यांची टीम, लाहेरीच्या गटप्रवर्तक महानंदाताई, आलदंडी येथील आशा स्वयंसेविका तसेच आरोग्य सेवक वडे, नैताम व सीडाम उपस्थित होते. फवारणी कर्मचारी धोटे व त्यांची टीम तसेच तालुका स्तरावरील आरोग्य विभागाचे कर्मचारीही मोहिमेत सहभागी झाले.
#thegdv #thegadvishva #gadchirolinews #Gadchiroli #Bhamragad #Aldandi #MalariaFree #MalariaAwareness #MalariaPrevention #HealthDepartment #HealthAwareness #Laheri #TribalHealth #PublicHealth #MalariaCampaign #MosquitoNet #HealthAwarenessCampaign #GadchiroliNews #MaharashtraNews #TheGadVishwa

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here