The गडविश्व
ता.प्र (चेतन गहाने) कुरखेडा, २० ऑक्टोबर : तालुक्यतील गेवर्धा येथील रेशन दुकानातून लाभार्थ्यांना निकृष्ट दर्जाचा गहू वाटप करण्यात येत असल्याचे चित्र आहे. प्राणीही हा गहू खाण्यास लाजतील अशी अवस्था असून त्याचे लाभार्थ्यांना वाटप करण्यात येत आहे. यामुळे लाभार्थ्यांच्या आरोग्याशी खेळल्याचा आरोप होत आहे.
गेवर्धा येथील रेशन दुकानातून ग्राहकांना धान्य वाटप करण्यात आले. गेल्या काही महिन्यांपासून कीटक आणि सुरवंटांनी खाल्लेला गहू लाभार्थ्यांना वितरित केला जात आहे. अंतोदय व बीपीएलधारकांना दुकानातून गहू व तांदूळ वाटप केले जाते. दिलेला तांदूळ निकृष्ट दर्जाचा आहे. राईस मिलर्सनी हेराफेरी केल्याची अनेक प्रकरणे समोर आली आहेत. गडचिरोलीत दिवसेंदिवस तांदळात भेसळीची प्रकरणे समोर येत आहेत. भरपाई म्हणून दिलेला धान विकून हे राईस मिलर्स निकृष्ट दर्जाचा तांदूळ खरेदी करून सरकारला देतात. शासनातर्फे येथील रेशन दुकानातून लाभार्थ्यांना तांदूळ वाटप केले जाते. मात्र सध्या गहू ही निकृष्ट दर्जाचा आहे. परंतु दिलेल्या गव्हाचे प्रमाण सुरवंटांनी भरलेले आहे. गहू पूर्णपणे खराब आहे. जनावरांनाही हा गहू खायला आवडत नाही. असा गहू लोकांना वाटला जात आहे. अशा परिस्थितीत नागरिकांची प्रकृती धोक्यात आली आहे. सरकारकडून चांगल्या सुविधा मिळतील या अपेक्षेने त्यांची निवड केली जाते. मात्र सत्तेत आल्यानंतर सरकारने नागरिकांच्या सुरक्षेकडे लक्ष दिले नसल्याचे यावरून स्पष्ट होते. आपण माणसं आहोत. आरोग्यानुसार आम्हाला धान्य द्या, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे. पुरवठा विभागाने याकडे लक्ष देण्याची मागणी नागरिकांनी केली आहे .