‘रक्तदान हेच सर्वश्रेष्ठ’ ; सार्वजनिक बाल दुर्गा उत्सव मंडळाचा स्तुत्य उपक्रम

159

– रक्तदान शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद
The गडविश्व
ता.प्र / देसाईगंज, २० ऑक्टोबर : सार्वजनिक बाल दुर्गा उत्सव मंडळ चोप यांचे वतीने दुर्गा मातेची स्थापना करून सतत नव दिवस समाजपयोगी जनउपयोगी शिबिर, कार्यक्रम उपक्रम राबवून हा उत्सव साजरा केला जातो. दरवर्षाला मंडळातर्फे रक्तदान शिबिर हा उपक्रम राबवून रक्त संकलन करून शासकीय आरोग्य यंत्रनेला मदत करीत आहेत. मागील दोन वर्षापासून हा उपक्रम सुरू आहे. आज २० ऑक्टोबर रोजी रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आला होता
या शिबिराचे उद्घाटन सरपंच नितिन लाडे यांच्या हस्ते झाले. कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून उपसरंच प्रकाश डोंगरवर गौरव नागपूरकर आदी मान्यवर उपस्थित होते. मंडळाच्या या उपक्रमाचे कौतुक सरपंच लाडे यांनी केले. यावेळी ४० रक्तदात्यांनी स्वयंस्फूर्तीने रक्तदान केले
कार्यक्रम यशश्वी करण्यासाठी शुभम नागपूरक, शेखर कुथे, विनोद डोंगरवार प्रमोद बावणे कुंदन बावणे, तिलक गायकवाड, विशू बावणे, गोविंदा बनपूरकर, तुषार उईके, सूरज बावणे, योगराज उईके, किशोर भोयर’ मयूर गायकवाड’ मंडळाचे सर्व कार्यकर्ते यांनी परिश्रम घेतले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here