मुरूमगाव येथे कौशल्य केंद्राचे उदघाटन

225

The गडविश्व
ता.प्र / धानोरा, २० ऑक्टोबर : तालुक्यातील मुरूमगाव येथे प्रमोद महाजन ग्रामीण कौशल्या विकास केंद्राचे ऑनलाईन उदघाटन कार्यक्रम शासकीय माध्यमिक आश्रम शाळा येथे आयोजित करण्यात आला.
या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रिमोट कंट्रोल ची कळ दाबून उदघाटन करताच उपस्थित मान्यवरांनी टाळ्यांच्या गजरात अभिनंदन केले.
यावेळी माजी जी. प .सदस्या लताबाई पुंघाटे, माजी प.स. सभापती अजमन रावटे, तहसीलदार लोखंडे, नायब तहसीलदार वाळके, बि. डी.ओ.सतिश टीचकुले, सरपंच शिवप्रसाद गवर्णा, उपसरपंच मथनुराम मलिया, ग्रा.प सदस्य राजू कोठवार, अभिजित मेश्राम, नोडल अधिकारी अशोक बुर्रेवार, मुख्याध्यापीका डी .वाय.मेश्राम, डॉ. राहुल बनसोड, डॉक्टर धूर्वे, ग्रामसेवक जे .एस. मेश्राम, महिला मंडळ सदस्य, अंगणवाडी सेविका, शासकीय आश्रम शाळा, दखणे विद्यालय येथील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी तसेच विद्यार्थी तसेच गावातील नागरिक बहुसंख्येने उपस्थित होते.
प्रमोद महाजन ग्रामीण कौशल्य विकास केंद्र ऑनलाइन उद्घाटन कार्यक्रमाचे आयोजन युवा विकास संस्था व जिल्हा कौशल्य व विकास कार्यक्रम गडचिरोली तर्फे करण्यात आले होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here