धानोरा : अवैध सागवानाची तस्करी, तिघांना अटक

80

धानोरा : अवैध सागवानाची तस्करी, तिघांना अटक
– लाखोंचा मुद्देमाल जप्त
The गडविश्व
ता.प्र/ धानोरा, दि. ०२ : धानोरा वनविभागाच्या दक्ष पथकाने अवैध सागवान लाकडाच्या तस्करीवर मोठी कारवाई करत तिघा तस्करांना अटक केली असून, या कारवाईत महिंद्रा पिकअप वाहन (क्रमांक CG 04 QL 0325) तसेच लाखोंचा सागवान लाकडाचा मुद्देमाल जप्त करण्यात आल्याची कारवाई ३१ ऑक्टोबर रोजी करण्यात आली. दक्षिण धानोरा वनपरिक्षेत्र अधिकारी सुमित पुरमशेट्टीवार यांना पवनी–धानोरा मार्गावरून सागवान लाकडाची अवैधरित्या वाहतूक होणार आहे अशी गुप्त माहिती मिळाली असता त्यानंतर त्यांनी आपल्या अधिनस्त पथकासह तात्काळ गस्ती मोहीम राबवली. गस्ती दरम्यान कक्ष क्रमांक 520 मधील रोपवाटिकेजवळ संशयास्पद पिकअप वाहन थांबवून तपासणी केली असता वाहनातील तिघांकडे सागवान लाकूड वाहतुकीचे कोणतेही अधिकृत परवाने किंवा कागदपत्रे नसल्याचे आढळले. त्यानुसार वनकर्मचाऱ्यांनी वाहन आणि लाकूड जप्त करून तिन्ही आरोपींना ताब्यात घेतले. शेख मोहीन शेख सत्तार (रा. धानोरा), अब्दुल हिफजान असांरी (रा. शांतिनगर, बरघाट, सिवनी, म.प्र.) आणि मंगेश सेयनू गावळे (रा. डब्बा, ता. धानोरा, जि. गडचिरोली) असे अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत.
या प्रकरणी ०१ नोव्हेंबर २०२५ रोजी वनगुन्हा नोंदविण्यात आला असून आरोपींवर भारतीय वन अधिनियम 1927 चे कलम 26(1)(ई, फ), 41, 42, 52 व 69 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सध्या आरोपींना वनकोठडीत ठेवण्यात आले असून पुढील चौकशी सुरू आहे. सदर कारवाई रमेश कुमार, मुख्य वनसंरक्षक, गडचिरोली वनवृत्त, आर्या व्ही.एस., उपवनसंरक्षक, गडचिरोली आणि अंबरलाल मडावी, सहाय्यक वनसंरक्षक (जंकास) यांच्या मार्गदर्शनाखाली वनपरिक्षेत्र अधिकारी सुमित पुरमशेट्टीवार आणि त्यांच्या पथकाने केली.
#thegdv #thegadvishva #gadchirolinews #gadchirolipolice #dhanoranews

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here