-कुरखेडा येथे काँग्रेस तालूका बूथ पदाधिकारी मेळाव्यात घनाघात
The गडविश्व
ता.प्र/ कुरखेडा (चेतन गहाने), दि.१० : भारताच्या स्वातंत्र्यानंतर प्रथम पंधरा वर्षात पंडित जवाहरलाल नेहरू यांचा नेतृत्वात विकासाचा ढाचा उभा करण्यात आला यावेळी दर्जेदार शैक्षणिक, आर्थिक केंद्र तसेच सिंचन सुविधा निर्माण करीत देशाचा विकासाला दिशा देण्यात आली मात्र या तोडीचे कार्य मागील १० वर्षात भाजपा प्रणीत केंद्र शासनाला करता न आल्याने व त्यांना स्वतःच्याच विकास कार्यावर विश्वास नसल्याने ७० वर्षापूर्वी झालेल्या विकास पर्वावर आज संसदेत टिका करण्यात येत आहे, असा घणाघात विधान परिषद सदस्य आ.अभिजीत वंजारी यांनी केला.
गडचिरोली जिल्हा काँग्रेस पक्षाच्या वतीने कुरखेडा येथील किसान मंगल सभागृहात तालुका बूथ पदाधिकारी मेळाव्याचे आयोजन आज करण्यात आले होते यावेळी मेळाव्याच्या उदघाटक स्थानावरून मार्गदर्शन करताना आ.अभिजीत वंजारी बोलत होते.
कार्यक्रमाचा अध्यक्षस्थानी जिल्हा काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष महेंद्र ब्राम्हणवाडे होते तर प्रमुख अतिथी म्हणून प्रदेश महासचिव डॉ.नामदेव किरसान, काँग्रेस आदिवासी आघाडीचे प्रदेशाध्यक्ष माजी आ.डॉ.नामदेव उसेंडी, माजी आमदार आनंदराव गेडाम, प्रदेश सरचिटणीस डॉ.नितीन कोडवते, महीला काँग्रेस प्रदेश सरचिटणीस डॉ.चंदा कोडवते, किसान आघाडीचे जिल्हा अध्यक्ष वामनराव सावसागडे, माजी जिल्हा अध्यक्ष हसनअली गिलानी, लता पेदापल्ली, माजी जि.प.उपाध्यक्ष मनोहर पोरेटी, सेवानिवृत्त पोलीस अधिक्षक निताराम कुमरे, रामदास मसराम, माजी जि.प.सदस्य तथा आविसचे सरसेनापती नंदू नरोटे, तालुका यूवक काँग्रेसचे अध्यक्ष गिरीधर तितराम, महिला तालूका अध्यक्ष आशाताई तूलावी, नगरसेवीका प्राचीताई धोंडणे, नगरसेवीका कुंदा तितीरमारे, नगरसेवीका हेमलता नंदेश्वर, माजी जि.प.सदस्य आशाताई कूमरे, माजी प.स.उपसभापति श्रीराम दूगा, कपील पेंदाम, राजकुमार बावनथळे तथा मोठ्या संख्येत काँग्रेस कार्यकर्ते हजर होते।
यावेळी नामदेव किरसान यांनी मार्गदर्शन करताना सांगीतले की निवडणूक ही व्यक्ति किंवा नेता जिंकत नाही तर निवडणूक जिंकण्याकरीता बूथ स्तरावरील कार्यकर्त्यांची फळी मजबूत असणे गरजेचे असल्याचे सांगीतले. यावेळी डॉ.नामदेव उसेंडी, माजी आमदार गेडाम यांनी सूद्धा मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे प्रस्ताविक तालुका काँग्रेस अध्यक्ष जीवन पाटील नाट, संचालन जिल्हा उपाध्यक्ष जयंत पाटिल हरडे तर आभार माजी जि.प.सदस्य प्रभाकर तुलावी यांक केले.