स्वावलंबी शिक्षण घेत विद्यार्थ्यांनी स्वतःच्या पायावर उभे रहावे : प्राचार्य डॉ. अविनाश गौरकार

311

– शिवाजी हायस्कूल कुरखेडा येथे निरोप समारंभ
The गडविश्व
ता.प्र / कुरखेडा (चेतन गहाने), दि.०९ : स्वावलंबी शिक्षण घेत विद्यार्थ्यांनी स्वतःच्या पायावर उभे रहावे असे प्रतिपादन प्राचार्य डॉ. अविनाश गौरकार यांनी केले. ते स्थानिक शिवाजी हायस्कूल कुरखेडा येथे ८ फेब्रुवारी रोजी सत्र २०२३-२४ या शैक्षणिक सत्रातील वर्ग १० वी च्या विद्यार्थ्यांना वर्ग ९ च्या विद्यार्थ्यांकडून निरोप समारंभाचे अयोजन करण्यात आले होते यावेळी अध्यक्ष स्थानावरून बोलत होते.या निरोप समारंभाला प्रमूख अतिथी म्हणुन विद्यालयाचे पर्यवेक्षक किशोर कोल्हे, ज्येष्ठ शिक्षिका संघमित्रा कांबळे, उध्दव वाघाडे, प्रकाश मुंगनकर, भिमराव सोरते हे उपस्थित होते. कार्यक्रमाप्रसंगी वर्ग १० वी तील विद्यार्थ्यांनी आपले अनुभव व्यक्त केले.
सदर निरोप समारंभाचे प्रास्ताविक विद्यालयातील शिक्षक चंद्रकांत नरुले यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वर्ग ९ वी तील विद्यार्थी निधी दखणे, श्रेयस उईके, डोनिया बुराडे , विश्र्वास अंबादे, सादिया मुघल, विषांत खोब्रागडे यांनी केले तर आभार सुहानी प्रधान हिने मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी विद्यालयातील वर्ग ९ तील वर्ग शिक्षक नागेश्वर गेडाम, चंद्रकांत नरूले, लिकेश कोडापे , विद्यालयातील शिक्षवृंद शिक्षकेतर कर्मचारी तसेच विद्यार्थ्यांनी सहकार्य केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here