खासदार डॉ. नामदेव किरसान यांच्या वाढदिवसानिमित्त ५ हजार स्पर्धा परीक्षार्थींना मोफत पुस्तकांचे वाटप
The गडविश्व
गडचिरोली, दि. ०७ : गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. नामदेव किरसान यांच्या १४ जुलै रोजी होणाऱ्या वाढदिवसानिमित्त यंदा सामाजिक बांधिलकी जपत स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या ५ हजार विद्यार्थ्यांना मोफत स्पर्धा परीक्षा पुस्तकांचे वितरण करण्यात येणार आहे. यासोबतच विविध जनहित, शैक्षणिक व सेवा उपक्रमांचेही आयोजन करण्यात आले आहे.
या उपक्रमाच्या नियोजनासाठी खासदार जनसंपर्क कार्यालय, गडचिरोली येथे पदाधिकारी व कार्यकर्त्यांची बैठक पार पडली. बैठकीत पुस्तक वितरण कार्यक्रम यशस्वी करण्याबरोबरच विविध सामाजिक उपक्रमांचे नियोजन, जबाबदाऱ्यांचे वाटप आणि समन्वयाबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. ग्रामीण व आर्थिकदृष्ट्या दुर्बल विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी दर्जेदार साहित्य उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात येत असल्याचे बैठकीत सांगण्यात आले.
बैठकीस महेंद्र ब्राह्मणवाडे, शहराध्यक्ष तथा नगरसेवक सतीश विधाते, प्रभाकर वासेकर, शंकरराव सालोटकर, आदिवासी सेल अध्यक्ष माधव गावड, असंघटित कामगार सेल अध्यक्ष कुणाल पेंदोरकर, तालुकाध्यक्ष वसंत राऊत (गडचिरोली), प्रमोद भगत (चामोर्शी), मिलिंद खोब्रागडे (आरमोरी), प्रशांत कोराम (धानोरा), राजेंद्र बुल्ले (वडसा), जिल्हा उपाध्यक्ष नेताजी गावतुरे, अनिल कोठारे, पर्यावरण विभागाचे जिल्हाध्यक्ष राजेश ठाकूर, सहकार विभागाचे जिल्हाध्यक्ष अब्दुलभाई पंजवानी, सोशल मीडिया विभागाचे जिल्हाध्यक्ष संजय चन्ने यांच्यासह दिवाकर निसार, नदीम नाथानी, ढिवरू मेश्राम, उत्तम ठाकरे, लालाजी सातपुते, विजय लाड, निकेश गद्देवार, जितेंद्र मुपिडवार, गणेश कोवे, रवींद्र पाल, मीनल चिमूरकर, शीतल ठवरे, रीता गोवर्धन, कविता उराडे, सोनू आलम, स्वप्नील बेहरे, गौरव येणप्रेड्डीवार, विपुल येलटीवार, संदीप भैसारे, विजय राऊत, तेजस कोंडेकर, सुशील शहा, परिमल बहादूर, सुधीर बांबोळे, रवी मेश्राम, मारोती कांबळे, दिनेश चापले, निखिल पुण्यप्रेड्डीवार, गजेंद्र नाईक, कुणाल आभारे, गौरव नवघडे, अमर नवघडे यांच्यासह काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.













