गडचिरोली : धावत्या एसटी बसचा मागील भाग निखळला, मोठी दुर्घटना थोडक्यात टळली

37

गडचिरोली : धावत्या एसटी बसचा मागील भाग निखळला; मोठी दुर्घटना थोडक्यात टळली
The गडविश्व
गडचिरोली, दि. ७ : गडचिरोली जिल्ह्यातील एसटी महामंडळाच्या बसची दयनीय अवस्था पुन्हा एकदा समोर आली आहे. धावत्या एसटी बसचा मागील भाग अचानक निखळल्याची धक्कादायक घटना नुकतीच घडली. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही; मात्र मोठी दुर्घटना थोडक्यात टळल्याने प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले.
या घटनेनंतर एसटी बसच्या सुरक्षिततेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित होत असून, जीर्ण झालेल्या बसमुळे प्रवाशांच्या जीवाशी खेळ सुरू असल्याची भावना नागरिकांमध्ये व्यक्त होत आहे. गडचिरोली जिल्ह्यात नवीन व सुरक्षित बसेस उपलब्ध करून देण्याची मागणी अनेक वर्षांपासून निवेदने, आंदोलने आणि मोर्चांच्या माध्यमातून होत असतानाही त्याकडे अपेक्षित गांभीर्याने लक्ष दिले जात नसल्याची नाराजी व्यक्त केली जात आहे.
यासंदर्भात काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे यांनी राज्याचे मुख्यमंत्री तथा गडचिरोलीचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे तातडीने हस्तक्षेप करण्याची मागणी केली आहे. त्यांनी प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात, “जिल्ह्यातील सर्वसामान्य नागरिकांना सुरक्षित आणि दर्जेदार एसटी बससेवाही उपलब्ध नाही. अशा परिस्थितीत विमानतळ उभारणीच्या योजना राबविण्यापेक्षा प्रवाशांच्या सुरक्षेला प्राधान्य देत अत्याधुनिक आणि नवीन एसटी बसेस उपलब्ध करून द्याव्यात,” अशी मागणी केली आहे.
धावत्या बसचा मागील भाग निखळण्याच्या घटनेनंतर जिल्ह्यातील एसटी बसच्या तांत्रिक तपासणीसह जीर्ण बसेस तातडीने सेवाबाह्य करून त्यांच्या जागी नवीन बसेस उपलब्ध करून देण्याची मागणीही जोर धरू लागली आहे.
#thegdv #thegadvishva #gadchirolinews

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here