दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना पटवून दिले तंबाखूचे दुष्परिणाम

135

The गडविश्व
गडचिरोली,१३ फेब्रुवारी : भामरागड तालुक्यातील शेवटच्या टोकावर वसलेल्या दुर्गम अशा बिनागुंडा येथील विनोबा भावे आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना मुक्तिपथ तालुका चमूने दारू व तंबाखूचे दुष्परिणाम पटवून दिले. सोबतच व्यसनांपासून दूर राहण्याचे आवाहन करण्यात आले.
मुक्तिपथ तालुका चमूने आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना खर्रा, दारू, तंबाखूमुळे होणाऱ्या १० दुष्परिणाम बाबत माहिती दिली. व्यसनांपासून दूर राहून आपली शाळा दारू तंबाखूमुक्त ठेवण्या करिता मार्गदर्शन करण्यात आले. सोबतच ८५ विद्यार्थ्यांना तंबाखूमुक्तीची शपथ देण्यात आली. यावेळी शाळेतील शिक्षक किशोर भूपतवार व कोडापे उपस्थित होते. त्यांनतर बिनागुंडा गावातील गाव पाटील रामा दुर्वा यांच्या उपस्थितीत गावसंघटन पुनर्गठीत करण्यात आली. सोबतच पेसा पुस्तक देऊन महत्व व वापर समजवून देण्यात आले. तसेच गावातील दारू व तंबाखूची सद्यस्थिती जाणून घेऊन व्यसन उपचार शिबिराचे नियोजन करण्यात आले. यावेळी गावातील नागरिक रामजी उसेंडी, मंगलू परसा, मारू तिम्मा, मारोती दुर्वा, मुक्तिपथचे आबिद शेख उपस्थित होते.

(The Gadvishva ) (Gadchiroli News Updates) (Muktipath) (बिग बॉस 16 विनर) (Super Bowl) (Megan Fox) (Christ the Redeemer) (Man City vs Aston Villa) (Chelsea) (PSG) vs Toulouse) (Man United vs Leeds United)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here