१०३ रुग्णांना हवी दारूच्या व्यसनातून मुक्ती

180

– विविध ठिकाणी तालुका क्लिनिक
The गडविश्व
गडचिरोली, १३ फेब्रुवारी : दारूच्या व्यसनातून मुक्ती मिळविण्यासाठी विविध तालुक्यातील १०३ रुग्णांनी गडचिरोली, देसाईगंज, एटापल्ली, अहेरी, कुरखेडा, चामोर्शी व सिरोंचा येथील मुक्तिपथच्या तालुका क्लिनिकला भेट दिली. यावेळी तज्ञांनी रुग्णांना औषधोपचारासह समुपदेशन देखील केले.
दारूचे व्यसन जडलेल्या रुग्णांना शारीरिक व मानसिक दुष्परिणाम दिसून येतात. व्यसन हे एक आजार असून यातून बाहेर पडण्यासाठी वेळेवर उपचार घेणे गरजेचे आहे. गडचिरोली सारख्या दुर्गम जिल्ह्यातील रुग्णांनाही वेळेवर व्यसन उपचार घेता यावे, यासाठी मुक्तिपथ अभियानाच्यावतीने गाव संघटनेच्या मागणीनुसार गाव पातळी शिबीर घेतल्या जाते. सोबतच तालुकास्थळी तालुका क्लिनिक सुद्धा उपलब्ध करून देण्यात आली आहे. आतापर्यंत अनेकांची या शिबिरांच्या माध्यमातून दारूचे व्यसन सोडले आहे. आठवडाभरात जिल्ह्यातील सात तालुका मुख्यालयी आयोजित क्लिनिकच्या माध्यमातून एकूण १०३ रुग्णांनी उपचार घेतला. यामध्ये गडचिरोली ९, देसाईगंज १९, एटापल्ली १८, अहेरी ८, कुरखेडा १६, चामोर्शी २२ व सिरोंचा तालुक्यातील ११ रुग्णांचा समावेश आहे. क्लिनिकला भेट दिलेल्या रुग्णांना समुपदेशन करीत दारूचे व्यसन असलेल्या जवळच्या व्यक्तींना व्यसन उपचार क्लिनिकला भेट देण्यासाठी प्रोत्साहित करण्याचे आवाहन करण्यात आले.

(The Gadvishva ) (Gadchiroli News Updates) (Muktipath) (बिग बॉस 16 विनर) (Super Bowl) (Megan Fox) (Christ the Redeemer) (Man City vs Aston Villa) (Chelsea) (PSG) vs Toulouse) (Man United vs Leeds United)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here