धानोरा : लेखा -गोडलवाही मार्गावर चारचाकीची दुचाकीला धडक, दोन गंभीर जखमी

729

महाराष्ट्र विधानपरिषद थेट प्रक्षेपण (अर्थसंकल्पीय अधिवेशन, फेब्रुवारी-मार्च २०२३)

धानोरा : लेखा -गोडलवाही मार्गावर चारचाकीची दुचाकीला धडक, दोन गंभीर जखमी
The गडविश्व
ता.प्र / धानोरा, १२ फेब्रुवारी : तालुक्यातील लेखा ते गोडलवाही मार्गावर मामा तलावाच्या वळण केंद्रावर रविवार १२ फेब्रुवारी रोजी ४ वाजताच्या सुमारास चारचाकी वाहनाने दुचाकीला धडक दिल्याने या अपघातात दोघेजण जखमी झाले. लचमन राणू पोटावी (६२) , दामा पदा (५५) दोघेही रा. गोडलवाही असे अपघातात जखमींची नावे असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहे.
एमएच ४९ बि ०६०५ या क्रमांकाचे चारचाकी वाहन गोडलवाही वरून लेखा मार्गाने येत होती तर दुचाकी वाहन लेखाकडून गोडलवाही कडे जात होते. दरम्यान मामा तलावाच्या वळण केंद्रावर चारचाकी वाहनाने दुचाकी वाहनास जबर धडक दिली यात दोघेजण गंभीररीत्या जखमी झाले असून जखमींना धानोरा येथील ग्रामीण रुग्णालयात उपचाराकरिता भरती करून प्राथमिक उपचार करून गडचिरोली येथे रेफर करण्यात आले आहे.

(The Gadvishva) (Gadchiroli news Updates) (Rod Accident)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here