अंध विद्यार्थ्यांच्या प्रभात फेरीतून ग्राहक हक्कांचा जागर

40

अंध विद्यार्थ्यांच्या प्रभात फेरीतून ग्राहक हक्कांचा जागर
The गडविश्व
गडचिरोली, दि. १५ : अखिल भारतीय ग्राहक पंचायत, जिल्हा गडचिरोली यांच्या वतीने ग्राहक हक्कांविषयी जनजागृती करण्यासाठी विशेष उपक्रम राबविण्यात आला. राष्ट्रीय दृष्टीहीन संघ, महाराष्ट्र यांच्या सहकार्याने आयोजित राज्यस्तरीय अंध कल्याण शैक्षणिक सप्ताह–२०२६ च्या निमित्ताने गडचिरोली शहरात अंध विद्यार्थी–विद्यार्थिनींच्या सहभागाने भव्य प्रभात फेरी काढण्यात आली.
या प्रभात फेरीदरम्यान “चला, ग्राहक हक्कांच्या रक्षणासाठी एकत्र येऊया” अशा प्रभावी घोषणांनी शहर परिसर दुमदुमून गेला. या उपक्रमामुळे गडचिरोली जिल्ह्यात ग्राहक चळवळीला नवे बळ मिळेल, असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला.
नगराध्यक्ष प्रणोती निंबोरकर यांच्या नेतृत्वाखाली निघालेल्या या प्रभात फेरीत ग्राहक पंचायतच्या जिल्हा महिला प्रमुख सुचिता उदय धकाते, प्रा. सुनीता विजय साळवे, अश्विनी भांडेकर, शिल्पा गव्हारे, स्मिता नेताम यांच्यासह जिल्हाध्यक्ष उदय धकाते, जिल्हा उपाध्यक्ष विजय साळवे, जिल्हा सचिव अरुण पोगळे आदी पदाधिकाऱ्यांनी सक्रिय सहभाग नोंदविला.
या उपक्रमातून अंध विद्यार्थी–विद्यार्थिनींमध्ये ग्राहक हक्कांविषयी जागृती निर्माण झाली असून, समाजातील प्रत्येक घटकाने ग्राहक संरक्षण चळवळीत सक्रिय सहभागी व्हावे, असे आवाहन यावेळी करण्यात आले.

#thegdv #thegadvishva #gadchirolinews #gadchirolipolice

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here