भामरागड : वृद्धाच्या निर्घृण हत्येचा छडा, दोघे आरोपी अटकेत

174

भामरागड : वृद्धाच्या निर्घृण हत्येचा छडा, दोघे आरोपी अटकेत
The गडविश्व
भामरागड, दि. १६ : भामरागड तालुक्यातील नेलगुंडा परिसरात १० जानेवारीच्या रात्री घडलेली थरारक घटना पोलिसांच्या सततच्या प्रयत्नांनी उलगडली आहे. ६६ वर्षीय पुसू नरंगो हबका यांचा झोपेतच कुऱ्हाडीने गळा चिरून निर्घृण खून करण्यात आला होता.
घटनेनंतर मृतकाच्या पत्नीच्या तक्रारीवरून नेलगुंडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी घटनास्थळी बारकाईने तपास करून संशयास्पदरीत्या वावरणाऱ्या प्रकाश विज्या वाचामी (२३) आणि दीपक दोगे वड्डे (२४) यांना ताब्यात घेतले. सुरुवातीला आरोपी काहीही बोलत नसतानाही, पोलिसांच्या चौकशीनंतर त्यांनी गुन्हा कबूल केला.
१५ जानेवारी रोजी दोन्ही आरोपींना भामरागड न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांनी या घटनेंचे गांभीर्य ओळखून तात्काळ तपासाचे आदेश दिले होते. माओवाद प्रभावित भागात ही घटना घडल्याने स्थानिक नागरिकांमध्ये खळबळ उडाली होती. पोलिसांच्या सततच्या प्रयत्नांनी या निर्घृण हत्येचा छडा लावण्यात यश आले असून परिसरात काही प्रमाणात शांति प्रस्थापित झाली आहे.

#thegdv #thegadvishva #gadchirolinews #gadchirolipolice #crimenews #bhamragad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here