कोरची–बेडगाव घाटामध्ये ट्रॅक पलटला; वाहतूक ठप्प, नागरिक त्रस्त

92

कोरची–बेड गाव घाटामध्ये ट्रॅक पलटला; वाहतूक ठप्प, नागरिक त्रस्त
The गडविश्व
ता. प्र. / कुरखेडा, दि. १६ : बेड गाव–कुरखेडा मार्गावरील कोरची–बेड गाव घाटामध्ये रात्रीच्या सुमारास ट्रॅक पलटल्याने वाहतूक पूर्णतः ठप्प झाली आहे. ट्रॅक रस्त्यावर आडवा पडल्याने केवळ दुचाकी वाहनेच कशीबशी मार्गक्रमण करू शकत असून चारचाकी व अवजड वाहनांसाठी मार्ग पूर्णपणे बंद झाला आहे.
सदर घाट मार्ग हा नेहमीच जड व अवजड वाहतुकीसाठी ओळखला जातो. या मार्गावरून छत्तीसगड व अन्य राज्यांकडून मोठ्या प्रमाणावर मालवाहतूक करणारी वाहने ये-जा करीत असतात. परिणामी येथे वारंवार लहानमोठे अपघात घडत असून मागील काही वर्षांत ट्रॅक पलटी, ब्रेक फेल झाल्याने अवजड वाहनांची धडक, तसेच दुचाकी व लहान वाहनांचे अपघात सातत्याने घडले आहेत.
या ट्रॅक पलटीच्या घटनेमुळे कोरची–कुरखेडा बस सेवा कालपासून बंद असून शैक्षणिक संस्था, शासकीय कार्यालयांतील कर्मचारी व प्रवाशांची मोठी गैरसोय होत आहे. विशेष म्हणजे, कधीकधी कोरची येथून रुग्णांना तातडीने कुरखेडा किंवा गडचिरोली येथे स्थलांतरित करावे लागते. मात्र सध्या मार्ग पूर्णतः बंद झाल्याने आरोग्यविषयक गंभीर प्रश्नही निर्माण झाला आहे, अशी चिंता नागरिकांतून व्यक्त होत आहे.
सदर ट्रॅक तात्काळ हटवून मार्ग वाहतुकीसाठी खुला करावा, अशी मागणी जोर धरू लागली असून नेमके केव्हा हा मार्ग सुरळीत होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
#thegdv #thegadvishva #gadchirolinews #gadchirolipolice #korchinews #kurkhedanews #bedgao

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here