बारावी निकालात बेडगाव जि.प. शाळेचा दबदबा; कोरची तालुक्यात अव्वल कामगिरी
The गडविश्व
ता. प्र/ कोरची, दि. ०७ : जिल्हा परिषद हायस्कूल तथा कनिष्ठ महाविद्यालय, बेडगावने इयत्ता बारावी (एच.एस.सी.) बोर्ड परीक्षा फेब्रुवारी/मार्च 2026 मध्ये उल्लेखनीय यश संपादन करत कोरची तालुक्यात आपला दबदबा कायम राखला आहे. गुणवत्तापूर्ण निकालामुळे शाळेच्या यशाची परंपरा पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे.
या परीक्षेत कु. अरुणा देविदास मानकर हिने 459 गुण (76.50 टक्के) मिळवत कोरची तालुक्यात प्रथम क्रमांक पटकावला. तिच्या या यशामुळे शाळा आणि गावाच्या शैक्षणिक क्षेत्रात अभिमानाची भर पडली आहे. तसेच कु. कोमल मांदाळे हिने 425 गुण (70.83 टक्के), कु. शुभांगी घोडाम हिने 409 गुण (68.17 टक्के), कु. रोशनी सहारे हिने 400 गुण (66.67 टक्के), कु. हर्षिला टेकाम हिने 399 गुण (66.50 टक्के) तर जितेंद्र गुरवेले याने 395 गुण (65.83 टक्के) मिळवत उत्तम यश संपादन केले.
शाळेचा एकूण निकाल 87.50 टक्के लागला असून प्राविण्य श्रेणीत 1, प्रथम श्रेणीत 9 तर द्वितीय श्रेणीत 32 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. विद्यार्थ्यांच्या मेहनतीसह शिक्षकांचे मार्गदर्शन आणि पालकांचे सहकार्य यामुळे हे यश शक्य झाल्याची भावना व्यक्त करण्यात आली.
विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल प्राचार्य चुडाराम धारने, शालेय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा रीना सलामे, उपाध्यक्ष दिनेश तांडेकर, सरपंच चेतानंद कीरसान, माजी विद्यार्थी संघाचे अध्यक्ष जितू वाळदे, माधुरीताई गददेवार (पोलीस पाटील), बापुजी उईके, सुहास मेश्राम तसेच शिक्षक श्रीहरी उसेंडी, गणेश सोनकलंगी, प्रमोद रामटेके, काजल मडावी, श्रीकृष्णा उईके, राकेश गायकवाड, विद्या उंबरकर, प्रणय लंजे, नेहा लिमजे, शिला नैताम आणि जिजा खुने यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.













