आरमोरी : शिक्षक आक्रोश शेंडे यांनी गावात सुरू केली ‘मोफत विद्यार्थी अभ्यासिका’

225

– स्तुत्य उपक्रमाने गावकरऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण
The गडविश्व
ता.प्र / आरमोरी, १८ मार्च : विद्यार्थ्यांना अभ्यासाविषयी आवड निर्माण व्हावी या हेतुने आरमोरी तालुक्यातील ठाणेगाव येथील लिसीट हायस्कुल मध्ये नुकतेच नवनियुक्त शिक्षक म्हणून नियुक्त झालेले शिक्षक आक्रोश शेंडे यांनी विद्यार्थ्यांकरिता गावात ‘मोफत विद्यार्थी अभ्यासिका’ सुरू केली आहे. या त्यांच्या स्तुत्य उपक्रमाने गावकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना अभ्यासाविषयी आवड निर्माण व्हावी, आजच्या काळातील स्पर्धेचे महत्व समजावे या उदात्त हेतुने हा उपक्रम शिक्षक आक्रोश शेंडे यांनी हाती घेतला असुन अशा प्रकारचा हा जिल्हयातील पहिलाच उपक्रम असल्याचे निदर्शनास येते. या अभ्यासिकेच्या उद्घाटन प्रसंगी उद्घाटक म्हणून ग्रामीण विकास शिक्षण संस्था चूरमुराचे संस्थापक डॉ. राजकुमारजी शेन्डे तसेच सहउद्घाटक ठाणेगावचे सरपंच मंडलवार तसेच गंगाधर कुकडकार, लिसिट हायस्कुल ठाणेगाव येथिल मुख्याध्यापिका कु. अर्चना साळवे, शिक्षिका स्नेहल आदींसह गावातील पालक व विद्यार्थी उपस्थित होते.

(The Gadvishva) (Gadchiroli News Updates) (Muktipath) (Chandrpur News Updates) (Nottm Forest vs Newcastle) (Lance Reddick) (F1) (OPPO N2 Flip) (IND vs AUS) (Australia vs India) (Armori) (Thanegao) (Akrosh Shende)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here