– आमदार कृष्णा गजबेंनी मानले मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांचे आभार
– १६ मे २०२३ पर्यंत निर्गमित शासन आदेशानुसार वीजपुरवठा मिळणार
The गडविश्व
ता.प्र / देसाईगंज, १८ मार्च : उद्योगविरहीत गडचिरोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या कृषी पंपाना केवळ ८ तास वीज पुरवठा करण्यात येत असल्याने याबाबत शेतकरी वर्गातून तीव्र संताप व्यक्त केल्या जाऊ लागला होता. ही गंभीर बाब लक्षात घेता आरमोरी विधानसभा क्षेत्राचे आमदार कृष्णा गजबे यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणविस यांच्याकडे याबाबत सातत्याने पाठपुरावा केला असता अखेर आज १८ मार्च सकाळ पासून दिवसा १२ तास वीज पुरवठा सुरु करण्यात आला असुन निर्गमित शासन आदेशानुसार १६ मे २०२३ पर्यंत वीजपुरवठा करण्यात येणार असल्याने आमदार कृष्णा गजबे यांनी शेतकऱ्यांच्या गंभीर समस्येची दखल घेतल्याबद्दल राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांचे आभार व्यक्त केले आहे.
आरमोरी विधानसभा क्षेत्रासह संपूर्ण गडचिरोली जिल्हा आदिवासी, दुर्गम व नक्षलग्रस्त असुन जिल्ह्यात कोणतेही मोठे उद्योग व्यवसाय नसल्याने नागरिक मोठ्या प्रमाणात शेती व्यवसायावर अवलंबून आहेत. खरीप हंगामात शेतपिकाचे नुकसान झाले त्यामुळे शेतकऱ्यांनी आरमोरी, वडसा, कुरखेडा तालुक्यासह गडचिरोली जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात रबी हंगामात उन्हाळी धान पिकाची लागवड केली आहे. परंतु जिल्ह्यात कृषी पंपांना केवळ ८ तास वीज पुरवठा करण्यात येत असल्याने ओलीता अभावी शेतातील उभे धान पिक करपुन शेतकऱ्यांना प्रचंड नुकसानीला सामोरे जाण्याची संभाव्य शक्यता निर्माण झाली होती.
दरम्यान ही गंभीर बाब लक्षात घेता आरमोरी विधानसभा क्षेत्राचे आमदार कृष्णा गजबे यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन देऊन आरमोरी मतदार संघासह संपूर्ण गडचिरोली जिल्ह्यात कृषी पंपांना दिवसा १२ तास वीज पुरवठा करण्याची पोटतिडकीने मागणी केली होती. सातत्याने पाठपुरावा केल्याने या गंभीर समस्येची दखल घेत १५ मार्च २०२३ रोजी उर्जा विभागाचे उपसचिव प्रशांत बडगेरी यांच्या स्वाक्षरीने शासनाच्या वतीने अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक महावितरण कंपनी प्रकाशगड, मुंबई यांनी महाराष्ट्र विज नियामक आयोगाची मान्यता घेऊन आरमोरी मतदार संघासह संपूर्ण गडचिरोली जिल्ह्यात कृषी पंपांना २ महिने दिवसा १२ तास वीजपुरवठा करण्याचे आदेश निर्गमित केले होते. त्या अनुषंगाने आज १८ मार्च सकाळपासुन १६ मे २०२३ पर्यंत दिवसा १२ तास वीज पुरवठा करणे सुरु केले असल्याने आरमोरी मतदार संघासह संपूर्ण गडचिरोली जिल्ह्यात कृषी पंपांना दिवसा १२ तास विज पुरवठा व्हावा या आशेवर असलेल्या शेतकऱ्यांनी निराश न होता संयम बाळगला त्याबद्दल आमदार कृष्णा गजबे यांनी राज्याचे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्या सह शेतकऱ्यांचेही आभार व्यक्त केले आहे.

(The gadvishva) (The gdv) (MLA Krushna Gajbe) (Gadchiroli Armori news updates)