अमेय पोरेड्डीवार यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन ; उद्या अंत्यसंस्कार

60

अमेय पोरेड्डीवार यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन ; उद्या अंत्यसंस्कार
The गडविश्व
गडचिरोली, दि. १६ : गडचिरोली शहराचे पहिले नगराध्यक्ष सुरेश सावकार पोरेड्डीवार यांचे सुपुत्र अमेय सुरेश सावकार पोरेड्डीवार (वय ३७) यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने दुःखद निधन झाले. त्यांच्या अकाली निधनामुळे गडचिरोली शहरात शोककळा पसरली आहे.
कुटुंबीयांकडून मिळालेल्या माहितीनुसार, अमेय पोरेड्डीवार यांच्यावर उद्या बुधवारी सकाळी १०.३० वाजता गडचिरोली येथील कठाणी नदीवरील मोक्षधाम येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यापूर्वी सकाळी १० वाजता त्यांच्या राहत्या घरी असलेल्या सावकार वाड्यातून अंतिमयात्रा निघणार आहे.
अमेय पोरेड्डीवार यांच्या निधनाची वार्ता समजताच सामाजिक, राजकीय, व्यावसायिक व शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवरांनी हळहळ व्यक्त केली. त्यांच्या अंतिम दर्शनासाठी व अंत्ययात्रेत सहभागी होण्यासाठी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याची शक्यता आहे.
त्यांच्या निधनाने सावकार पोरेड्डीवार कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून संपूर्ण शहर शोकमग्न झाले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here