गडचिरोली : शासकीय कार्यालयांत तंबाखू सेवन करणाऱ्या तीन कर्मचाऱ्यांवर दंडात्मक कारवाई

92

गडचिरोली : शासकीय कार्यालयांत तंबाखू सेवन करणाऱ्या तीन कर्मचाऱ्यांवर दंडात्मक कारवाई
The गडविश्व
गडचिरोली, दि. २९ : शासकीय कार्यालये तंबाखूमुक्त करण्यासाठी ‘मुक्तिपथ’ जिल्हा दारू व तंबाखूमुक्त प्रशासकीय पथकाने एटापल्ली शहरात धडक तपासणी मोहीम राबवली. या मोहिमेदरम्यान तंबाखू सेवन करणाऱ्या तीन शासकीय कर्मचाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली.
पथकाने तालुका कृषी अधिकारी कार्यालय, ग्रामीण रुग्णालय, तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय तसेच स्टेट बँक ऑफ इंडिया या ठिकाणी अचानक भेट देत तपासणी केली. यावेळी तीन कर्मचारी तंबाखू व खर्रा बाळगून असल्याचे निदर्शनास आले. कार्यालयीन शिस्त व पावित्र्य भंग केल्याप्रकरणी संबंधितांवर तत्काळ दंड ठोठावण्यात आला.
तपासणीदरम्यान पथकाने शहरातील व्यावसायिक प्रतिष्ठानांचीही पाहणी केली. एका पाणठेल्यावर छापा टाकला असता सुगंधित तंबाखूचा साठा आढळून आला. यावेळी दोन डबे तंबाखू जप्त करण्यात आले असून विक्रेत्यास तंबाखूजन्य पदार्थांची विक्री बंद करण्याचे निर्देश देण्यात आले.
शासकीय कार्यालये व सार्वजनिक ठिकाणी तंबाखूमुक्त वातावरण राखण्यासाठी ही मोहीम अधिक तीव्र करण्यात येणार असल्याचा इशारा प्रशासनाने दिला आहे. या कारवाईमुळे तंबाखू व खर्रा सेवन करणाऱ्या कर्मचाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे.
#thegdv #thegadvishva #gadchirolipolice #gadchirolinews #muktipath

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here