गडचिरोली : पत्नीच्या त्रासाला कंटाळून पतीची विहिरीत उडी, चिठ्ठीत आत्महत्येचा उल्लेख

178

गडचिरोली : पत्नीच्या त्रासाला कंटाळून पतीची विहिरीत उडी, चिठ्ठीत आत्महत्येचा उल्लेख
The गडविश्व
गडचिरोली, दि. २० : पोर्ला येथील तुलतुली प्रकल्प कॉलनी परिसरात एका ३८ वर्षीय व्यक्तीने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली असून परिसरात खळबळ उडाली आहे. पुंडलिक रमेश डहलकर (वय ३८) असे मृतकाचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, १८ मार्च २०२६ रोजी रात्री सुमारे ८ ते ८.३० वाजताच्या दरम्यान पुंडलिक डहलकर हे नेहमीप्रमाणे घरातून बाहेर पडले. मात्र बराच वेळ होऊनही ते परत न आल्याने कुटुंबीयांनी शोधाशोध सुरू केली. दरम्यान, त्यांच्या खोलीत मोबाईलजवळ एक चिठ्ठी आढळून आली. या चिठ्ठीत त्यांनी पत्नी सोनाली डहलकर व तिच्या कुटुंबीयांच्या त्रासामुळे आत्महत्या करत असल्याचा उल्लेख केला असून आई-वडिलांचा कोणताही दोष नसल्याचे नमूद केले आहे.
यानंतर शोध घेत असता पोर्ला येथील तुलतुली प्रकल्प कॉलनीतील विहिरीत त्यांचा मृतदेह आढळून आला. विहिरीच्या पाण्यात बुडाल्याने मृत्यू झाल्याचे प्राथमिक तपासात स्पष्ट झाले आहे.
या प्रकरणी फिर्यादी रमेश लहानुजी डहलकर (वय ६२) यांच्या तोंडी फिर्यादीवरून गडचिरोली पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.
#thegdv #thegadvishva #gadchirolipolice #gadchirolinews

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here