कोरची येथे व्यावसायिक शिक्षण-उद्योगकता कार्यशाळेला उत्स्फूर्त प्रतिसाद

40

कोरची येथे व्यावसायिक शिक्षण-उद्योगकता कार्यशाळेला उत्स्फूर्त प्रतिसाद
The गडविश्व
ता.प्र / कोरची, दि. १७ : पंचायत समिती कोरची अंतर्गत आयएसओ नामांकित गट साधन केंद्रात १० व १२ मार्च २०२६ रोजी माध्यमिक शिक्षकांसाठी व्यावसायिक शिक्षण व उद्योगकता या विषयावर दोन दिवसीय प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यशाळेचे उद्घाटन गटशिक्षणाधिकारी अमित दास यांच्या हस्ते पार पडले. कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून नामदेव नागपुरे, उमाकांत ढोक व शिवाजी वाघमारे उपस्थित होते. प्रशिक्षणाचे सुलभक म्हणून राजेंद्र मस्के व प्रा. देवानंद दरवडे यांनी मार्गदर्शन केले.
या कार्यशाळेत व्यावसायिक शिक्षणाचे महत्त्व, विद्यार्थ्यांमध्ये उद्योगकतेची जाणीव निर्माण करणे तसेच शालेय स्तरावर कौशल्याधारित उपक्रम कसे राबवावेत याबाबत सविस्तर माहिती देण्यात आली. शिक्षकांनी प्रशिक्षणात सक्रिय सहभाग नोंदवत विविध उपक्रमांद्वारे संकल्पना आत्मसात केल्या.
यावेळी पंचायत समिती अंतर्गत विविध माध्यमिक शाळांतील शिक्षक व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या प्रशिक्षणामुळे शिक्षकांना व्यावसायिक शिक्षणाबाबत उपयुक्त मार्गदर्शन मिळाले असून विद्यार्थ्यांच्या कौशल्य विकासाला चालना मिळेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.
#thegdv #thegadvishva #gadchirolinews #gadchirolipolice #korchinews

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here