गडचिरोलीत लोहखनिज वाहतुकीचा आणखी बळी ; ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार ठार, एक जखमी

169

गडचिरोलीत लोहखनिज वाहतुकीचा आणखी बळी ; ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार ठार, एक जखमी
The गडविश्व
गडचिरोली, दि.१४ : आष्टी–अहेरी मुख्य मार्गावर सुरू असलेल्या लोहखनिज वाहतुकीमुळे अपघातांची मालिका थांबण्याचे नाव घेत नसतानाच आणखी एकाचा बळी गेला आहे. लोहखनिज वाहतूकीमध्ये असलेल्या भरधाव ट्रकने दुचाकीला दिलेल्या धडकेत दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला, तर त्याचा मित्र जखमी झाल्याची घटना शनिवारी (दि. १४मार्च) रोजी सकाळी घडली.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, चामोर्शी येथील अतुल रामदास भुरे (35) हे आपल्या मित्रासह दुचाकी क्रमांक MH-33 AJ 9952 ने चामोर्शीहून अहेरीकडे जात होते. सकाळी सुमारे 10 वाजताच्या सुमारास आष्टी–अहेरी मुख्य मार्गावरील लगाम येथे लोहखनिज वाहतुकीमध्ये असलेल्या MH-34 CQ 2329 क्रमांकाच्या ट्रकने दुचाकीस मागून जोरदार धडक दिली. धडकेनंतर दोघेही रस्त्यावर कोसळले. यावेळी ट्रकचे चाक अतुल भुरे यांच्या अंगावरून गेल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला तर
अपघातात दुचाकीवरील दुसरा युवक वैभव अरुण आत्राम (वय 27, रा. कॅम्प एरिया, गडचिरोली) हा जखमी झाला असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत.
या प्रकरणी ट्रक चालक टिकेश्वर गुलाब वानखेडे (58), रा. बंगाली कॅम्प, चंद्रपूर याच्याविरुद्ध अहेरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सपोनि देवेंद्र पटले, पोलीस स्टेशन अहेरी करीत आहेत.
दरम्यान, परिसरात मोठ्या प्रमाणावर सुरू असलेल्या लोहखनिज वाहतुकीमुळे अपघातांचे प्रमाण वाढत असल्याची नागरिकांकडून वारंवार तक्रार करण्यात येत आहे. तरीही वाहतुकीवर प्रभावी नियंत्रण नसल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.
#thegdv #thegadvishva #gadchirolinews #gadchirolipolice #Gadchiroli #Aheri #IronOreTransport #RoadAccident #TruckAccident #BreakingNews #MaharashtraNews #AccidentNews #RoadSafety #TruckCollision #Chandrapur #GadchiroliNews

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here