सकाळीच एसटी बस रस्त्यात बंद ; धानोऱ्यात प्रवाशांची तारांबळ
The गडविश्व
ता. प्र / धानोरा, दि. १५ : मुरूमगावहून धानोरा येथे येणारी राज्य परिवहन महामंडळाची एसटी बस गुरुवारी (दि. १६) सकाळी अचानक रस्त्यातच बंद पडल्याने प्रवाशांची चांगलीच तारांबळ उडाली. एम.एच. ४० ए.क्यू. ६१०२ क्रमांकाच्या बसच्या स्टिअरिंग यंत्रणेत तांत्रिक बिघाड झाल्याने चालकाने प्रसंगावधान राखत बस धानोरा येथे थांबवली.
बस थांबल्यामुळे काही काळ वाहतुकीचा खोळंबा निर्माण झाला. बसमधील महिला, ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थी व कामगार प्रवासी अडचणीत सापडले. अचानक प्रवास खंडित झाल्याने प्रवाशांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली.
घटनेची माहिती मिळताच संबंधित एसटी आगाराकडून पर्यायी बस अथवा दुरुस्ती पथक पाठवण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली; मात्र, प्रत्यक्ष मदत मिळेपर्यंत प्रवाशांना बराच वेळ प्रतीक्षा करावी लागली.
सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, वारंवार होणाऱ्या एसटी बस बिघाडांमुळे प्रवाशांचा संयम सुटत असून, बस डेपोमधून सोडण्यापूर्वी नियमित तपासणी व वेळेवर देखभाल करण्याची मागणी प्रवाशांकडून जोर धरू लागली आहे.
#thegdv #thegadvishva #gadchirolinews #gadchirolipolice













