कोटगुल येथे पोलीस विभाग व मुक्तिपथच्या वतीने भव्य व्यसनमुक्ती रॅली

90

कोटगुल येथे पोलीस विभाग व मुक्तिपथच्या वतीने भव्य व्यसनमुक्ती रॅली
– विद्यार्थ्यांच्या घोषणांनी दुमदुमले कोटगुल; दारू विक्रेत्यांना थेट इशारा
The गडविश्व
ता. प्र / कोरची, दि. ०८ : व्यसनमुक्त समाजनिर्मितीचा संदेश देत तरुण पिढीला घातक व्यसनांपासून दूर ठेवण्याच्या उद्देशाने कोरची तालुक्यातील कोटगुल येथे पोलीस विभाग व मुक्तिपथ यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य व्यसनमुक्ती जनजागृती रॅली काढण्यात आली. या रॅलीत विद्यार्थी, शिक्षक तसेच पोलीस प्रशासनाने उत्स्फूर्त सहभाग नोंदवत संपूर्ण गावात व्यसनमुक्तीचा संदेश पोहोचविला.
रॅलीमध्ये टिपागड विद्यालय, शासकीय आश्रम शाळा तसेच जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा, कोटगुल येथील विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. हातात व्यसनमुक्तीचे फलक घेऊन आणि जोरदार घोषणाबाजी करत विद्यार्थ्यांनी गावातील प्रमुख मार्गांवरून रॅली काढली. यावेळी विद्यार्थ्यांनी दारू विक्रेत्यांची भेट घेऊन दारूबंदीबाबत कडक सूचना देत सामाजिक जबाबदारीची जाणीव करून दिली.
रॅलीचा समारोप पोलीस स्टेशनमध्ये झाला. यावेळी उपस्थित विद्यार्थी व नागरिकांना विविध कायदेशीर तरतुदींची माहिती देण्यात आली. पोलीस निरीक्षक साळुंखे व पीएसआय शिंदे यांनी विद्यार्थ्यांना व्यसनांपासून दूर राहण्याचे आवाहन करत व्यसनांचे दुष्परिणाम व त्यावरील कायदेशीर कारवाईबाबत मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमाला पोलीस कर्मचारी बाबुराव कवडो, अनिल मडावी, सविराज कोरेटी, अनिल ढोरे, मनीषा शिडाम, वैशाली धुर्वा, मुक्तिपथचे युवनाथ मेश्राम, प्रेरक अरुणा गोंनाडे, स्पार्क कार्यकर्ता धर्मेंद्र कुसराम तसेच ग्राम सरपंच कुंभरे यांची प्रमुख उपस्थिती होती. रॅली यशस्वी करण्यासाठी टिपागड विद्यालयाचे मुख्याध्यापक संहारे, शिक्षक एस. के. बावणे, आर. बी. कांबळे, एस. एम. बसोने, कु. पी. बी. मोहुर्ले, जि. प. शाळा कोटगुल येथील मडावी, मेश्राम, हुपुंडी, तसेच शासकीय आश्रम शाळेचे मुख्याध्यापक कुरसंगे व शिक्षक करंजामी, कोरचा, देवदास पदा, कुलसंगे यांनी मोलाचे सहकार्य केले.
#thegadvishva #thegdv #AddictionFree #DeAddictionRally #Muktipath #Gadchiroli
#PoliceAwareness #YouthAgainstAddiction #SocialAwareness #DrugFreeIndia

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here