रुग्ण कल्याण समितीच्या सभेत नवनियुक्त सदस्य जयंत हरडे यांचा सत्कार

53

रुग्ण कल्याण समितीच्या सभेत नवनियुक्त सदस्य जयंत हरडे यांचा सत्कार
The गडविश्व
ता. प्र / कुरखेडा, दि. ०८ : उपजिल्हा रुग्णालय कुरखेडा येथील रुग्ण कल्याण समितीच्या अशासकीय सदस्यपदी आमदार रामदास मसराम यांच्या शिफारशीनुसार नुकतीच जयंत पाटील हरडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या नियुक्तीबद्दल आज दिनांक ८ जानेवारी रोजी आयोजित रुग्ण कल्याण समितीच्या सभेत समितीच्या वतीने पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. अमित ठमके, समिती सदस्य व नायब तहसीलदार एस. ई. जी. अनमदवार, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. ए. व्ही. गहाणे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कनिष्ठ अभियंता आर. के. पाल, सहायक अधीक्षक उमेश जंगावार तसेच अशासकीय सदस्य विजयालक्ष्मी वघारे, सिराजखान पठाण आदी उपस्थित होते.
नवनियुक्त सदस्य जयंत हरडे यांच्या सहभागामुळे उपजिल्हा रुग्णालयातील रुग्णसेवा, सुविधा व विकासकामांना अधिक बळ मिळेल, अशी अपेक्षा यावेळी व्यक्त करण्यात आली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here