गडचिरोली शहराच्या वाढीव पाणीपुरवठा योजनेसाठी १३१ कोटी मंजूर

58

– अखेर आमदार डॉ. देवराव होळी यांचा पुढाकाराला यश 
The गडविश्व
गडचिरोली, दि.१३ : शहराची वाढती लोकसंख्या लक्षात घेता भविष्यात या ठिकाणी पाण्याची निर्माण होणारी टंचाई दूर करण्यासाठी वाढीव पाणीपुरवठा प्रस्ताव तयार करण्यात आला होता त्या प्रस्तावाला मंजूरी मिळावी अशी मागणी आमदार डॉ. देवराव होळी यांनी राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री यांच्याकडे लावून धरली होती. अखेर या मागणीला मंजुरी मिळाली असून गडचिरोली शहराच्या वाढीव पुरवठा योजनेसाठी १३१ कोटी रुपये मंजूर करण्यात आमदार डॉ. देवराव होळी यांच्या प्रयत्नांना यश मिळाले आहे. यामुळे भविष्यात गडचिरोली शहरवासीयांची पाण्याची तहान शमणार आहे.
मुंबई येथील मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी भेट घेऊन आमदार डॉ. देवराव होळी यांनी राज्याचे मुख्यमंत्री ना.एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री ना. देवेंद्र फडणविस, उपमुख्यमंत्री ना.अजित पवार यांचे मानले आभार मानले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here