– चामोर्शी येथे ढीवर ,भोई व केवट समाज मेळावा संपन्न
The गडविश्व
चामोर्शी, दि. १४ : आमदार डॉ. देवराव होळी विकासाचे पुरस्कर्ते आहेत. यांनी आपल्या समाजासाठी केलेली विकास कामे खरोखरच अभिनंदनीय असून आपला ढीवर, भोई केवट समाज आमदार डॉ. देवराव होळी यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा असल्याचे प्रतिपादन सकल ढीवर समाज सेवा समिती चंद्रपूरचे अध्यक्ष डॉ. दिलीप शिवरकर यांनी चामोर्शी येथे ढीवर ,भोई व केवट समाजाच्या मेळाव्याप्रसंगी केले.
चामोर्शी येथील तेली समाज सभागृहामध्ये ढीवर, भोई व केवट समाज बांधव व आमदार डॉ. देवराव होळी मित्र परिवाराच्या वतीने या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. या मेळाव्याला आमदार डॉ. देवराव होळी यांनी मार्गदर्शन केले. मेळाव्याला उपस्थित होऊन आपल्यावर प्रेम व्यक्त केल्याबद्दल समाज बांधवांचे आभार मानले.
यावेळी मंचावर ढीवर, भोई समाजाचे जिल्हा उपाध्यक्ष सुधाकर गद्देझ सुधाकर गद्दे, शामराव राऊत, सुरेश गद्दे, संजय शिंदे, संगीता भोयर, देविदास भोयर, ठुमदेव सरपे, विलास गोहणे, देवराव वाघाडे, गुरूदास गेडाम, दिवाकर भोयर, संगीता गेडाम, ज्ञानेश्वर भोयर, मुकरू राऊत, सकल धीवर समाज सेवा समितीचे संचालक विजयजी नाने, जय वाल्मिकी समाज गनपूरचे शामराव राऊत , यांचे सह मान्यवर मंचावर उपस्थित होते.