– अतिरिक्त सत्र न्यायाधीश अहेरी, आर एन. बावणकर यांचा न्यायनिर्वाळा
The गडविश्व
गडचिरोली, दि. १३ : महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी आरोपीस तीन महीने कारावास व २ हजार रुपये द्रव्यदंडाची शिक्षा अतिरिक्त सत्र न्यायाधीश, अहेरी आर एन. बावणकर यांनी ठोठावली आहे.
जागे जगन्नाथ शिवकुमार बैरामी, (वय ३६) रा. एटापल्ली हसु पंदेवाही ता एटापल्ली जि. गडचिरोली असे आरोपीचे नाव आहे.
प्राप्त माहितीनुसार, पीडित ही जंगल परिसरात शौचास गेली असता एकटी असल्याचा फायदा आरोपीने घेत तिचा विनयभंग केला. याबाबत पिडीतेने एटापल्ली पोलीस ठाणे गाठून तक्रार दकाहली केली. तक्रारीच्या अनुषंगाने पोलिसांनी तपास केला असता आरोपी विरुध्द सबळ पुरावा मिळून आल्याने दोषारोपपत्र तयार करून सेशन कोर्टात दाखल केले. यावेळी अतिरिक्त सत्र न्यायालय, अहेरी यांनी साक्ष पुरावा घेतले असता तक्रारदार व साक्षीदार यांचे पुरावा व सरकारी पक्षाचा युक्तीवाद न्यायालयाने ग्राहय धरुन १३ सप्टेंबर २०२४ रोजी आरोपी जगन्नाथ शिवकुमार बैरागी यास कलम ३५४ भादवी मध्ये तीन महीने कारावास व २ हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली आहे.
सरकार पक्षातर्फे सहा, सरकारी वकील एन एम भांडेकर यांनी कामकाज पाहीले तसेच गुन्हयाचा तपास उप विभागीय पोलीस अधिकारी, एटापल्ली भी शशिकांत भोसले यांनी केला तसेच संबधीत प्रकरणात साक्षदारांशी समन्वय साधुन प्रकरणाती निर्मती करीता कोर्ट तैस्ती अधिकारी व अंमलदार यांनी कामकाज पाहीले.
(#thegdv #thegadvishva #thegadvishva #gadchirolilocalnews #gadchirolipolice )