– अपघातात अनेक जण जखमी
The गडविश्व
श्रीनगर : लडाख प्रदेशात २६ सैनिकांना घेऊन जाणारे भारतीय लष्कराचे वाहन श्योक नदीत कोसळून अपघात झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. अपघातात सात जवानांचा मृत्यू झाला आहे तर अनेक जवान जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे.थॉईसपासून सुमारे २५ किमी अंतरावर हा अपघात झाला. लष्कराचे वाहन सुमारे ५० ते ६० फूट खोलवर श्योक नदीत कोसळले. सर्व २६ जवानांना परतापूर येथील ४०३ फील्ड हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले. त्यानंतर लेहहून परतापूरला सर्जिकल टीम पाठवण्यात आली. आतापर्यंत ७ जवानांना मृत घोषित करण्यात आले आहेत.
लष्कराची बस कोणत्या कारणांमुळे रस्त्यावरून घसरली आणि नदीत कोसळली, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून शोक व्यक्त
लडाखमध्ये बस अपघातात भारतीय लष्कराच्या जवानांचा मृत्यू झाल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीव्र दु:ख व्यक्त केले आहे.
“लडाखमध्ये झालेल्या बस अपघाताच्या घटनेने मी अत्यंत व्यथित झालो. या अपघातात आपण लष्कराचे शूर जवान गमावले. शोकाकुल कुटुंबियांच्या दुःखात आपण सहभागी आहोत. या अपघातात जखमी झालेले जवान लवकरच बरे होवोत अशी आपली प्रार्थना आहे. बाधितांना आवश्यक ती मदत पुरवली जात आहे” असे पंतप्रधानांनी आपल्या ट्विटर संदेशात म्हटले आहे.
Anguished by the bus accident in Ladakh in which we have lost our brave army personnel. My thoughts are with the bereaved families. I hope those injured recover at the earliest. All possible assistance is being given to the affected.
— Narendra Modi (@narendramodi) May 27, 2022