चुरमुरा जवळ भरधाव अज्ञात वाहनाच्या धडकेत युवकाचा जागीच मृत्यू

3

चुरमुरा जवळ भरधाव अज्ञात वाहनाच्या धडकेत युवकाचा जागीच मृत्यू
– अपघातानंतर चालक फरार; दहा दिवसांत दुसरी हिट अँड रन घटना
The गडविश्व
ता. प्र/ आरमोरी, दि. ३०: तालुक्यातील चुरमुरा गावाजवळ भरधाव अज्ञात वाहनाच्या धडकेत एका युवकाचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना बुधवारी सकाळी उघडकीस आली. अपघातानंतर वाहनचालक घटनास्थळावरून फरार झाला. दहा दिवसांतील ही दुसरी हिट अँड रन घटना असल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
मृत युवकाचे नाव कुंदन वासुदेव उरकुडे (वय २९, रा. वासाळा) असे आहे. कुंदन हा २९ एप्रिल रोजी पहाटे वसा येथून आपल्या गावाकडे वासाळा येथे पायी जात होता. पहाटे १.४० ते सकाळी ७ वाजेच्या दरम्यान चुरमुरा गावासमोरून जात असताना मागून आलेल्या अज्ञात वाहनाने त्याला जोरदार धडक दिली. धडक इतकी भीषण होती की त्याचा जागीच मृत्यू झाला.
अपघातानंतर चालक वाहनासह पसार झाला. याप्रकरणी मयताचा भाऊ शुभम वासुदेव उरकुडे (वय २७, रा. वासाळा) यांनी आरमोरी पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यावरून पोलिसांनी अज्ञात वाहनचालकाविरुद्ध भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम २८१, १०६(१) तसेच मोटार वाहन कायद्यानुसार गुन्हा नोंदविला आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास पोलिस निरीक्षक कैलास गवते यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हवालदार चंपा कामतकर करीत आहेत.
दरम्यान, २९ एप्रिल रोजी किटाळी गावाजवळही एका वृद्धाचा अज्ञात वाहनाच्या धडकेत मृत्यू झाला होता. सलग अपघातांमुळे भरधाव वाहनांवर कठोर कारवाईची मागणी नागरिकांकडून होत आहे.
#thegdv #thegadvishva #gadchirolinews #gadchirolipolice

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here