सन २०२३-२४ खरीप पिकाची हंगामी पैसेवारी जाहीर

263

The गडविश्व
गडचिरोली, ०८ ऑक्टोबर : खरीप पिकाची हंगामी पैसेवारी तहसिलदार यांचेकडून प्राप्त माहितीचे आधारे संकलीत करुन गडचिरोली जिल्ह्याची सन 2023-2024 या वर्षाची खरीप पिकाची हंगामी पैसेवारी जाहीर करण्यात येत आहे.
गडचिरोली जिल्ह्यात एकूण 1689 गावे असून खरीप पिकाची गावे 1548 आहेत. व एकूण पिका खालील क्षेत्राच्या 2/3 क्षेत्रामध्ये खरीप पिकाची पेरणी केलेल्या रब्बी गावांची संख्या 08 आहेत. त्यापैकी खरीप गावामध्ये पीके नसलेली गांवे 52 आहेत. सदर खरीप पिक असलेल्या गावांपैकी 50 पैशाचे आत पैसेवारी असलेले 0 असून 50 पैशाचे वर पैसेवारी असलेल्या एकूण खरीप पिक असलेल्या गावांची संख्या 1504 आहेत. अशा प्रकारे एकूण 1504 खरीप पिक असलेल्या गावाची पैसेवारी जाहीर केलेली आहे. गडचिरोली जिल्ह्याची खरीप हंगाम 2023-2024 या वर्षाची हंगामी पैसेवारी ही 0.71 आहे. असे जिल्हाधिकारी, गडचिरोली यांनी कळविले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here