गडचिरोली : वाघाच्या हल्ल्यात जखमी झालेल्या महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू

1714

आंबेशिवणी येथील सोनम उंदिरवाडे या महिलेवर वाघाने केला होता हल्ला
The गडविश्व
गडचिरोली, ९ डिसेंबर : वाघाच्या हल्ल्यात जखमी झालेल्या आंबेशिवणी येथील महिला सोनम उंदरवाडे यांची अखेर मृत्यूशी संपली असून शुक्रवार ९ डिसेंबर रोजी सकाळच्या सुमारास नागपूर मेेडीकल कॉलेज मध्ये उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची माहिती प्राप्त झाली आहे.
गडचिरोली जिल्हा मुख्यालयापासून काही अंतरावर असलेल्या आंबेशिवणी परिसरात ४ डिसेंबर रोजी वाघाच्या हल्लयात सोनम उंदिरवाडे (२५) हया जखमी झाल्या होत्या. त्यांच्यावर नागपूर मेडीकल कॉलेज मध्ये उपचार सुरू होता. मात्र ४ तारखेपासून मृत्यूशी झुंज देत असलेल्या सोनम उंदिरवाडेचा शुक्रवार ९ डिसेंबर रोजी सकाळी ७ वाजताच्या सुमारास मृत्यू झाला आहे.
त्यांच्या मृत्यूने उदिरवाडे कुटुंबावर दुखाचा डोंगर कोसळलेला आहे. परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

गडचिरोलीत वाघ बिनधास्त : आणखी एका महिलेवर हल्ला करीत केले जखमी

(The Gadvishva) (Gadchiroli News Updates) (Tiger Attack) (Sonam undirwade)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here