श्री संत संताजी जगनाडे महाराज यांचे कार्य प्रेरणादायी : दिवाकर भोयर

223

The गडविश्व
ता. प्र / धानोरा, ९ डिसेंबर : श्री.संत जगनाडे महाराज यांनी समाजाला अंधश्रद्धेतून बाहेर काढण्याचे बहुमुल्य काम केले. अशा या संत शिरोमणी महाराज जयंती उत्सव साजरी करताना त्यांचे प्रेरणादायी कार्य तरुणांनी अंगिकार करावे, त्याचा उपयोग समाजाच्या प्रगतीसाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करावेत, आपल्या मनातील मतभेद दूर सारून समाजकार्यासाठी एकत्र येणे गरजेचे असल्याचे मत निमगाव येथील सहाय्यक शिक्षक दिवाकर भोयर यांनी मांडले. ते धानोरा तालुक्यातील निमगाव येथे बहुउद्देशीय तेली समाजसेवा महासंघ निमगावच्या वतीने श्री संत जगनाडे महाराज जयंती उत्सव कार्यक्रमात मार्गदर्शक म्हणून बोलत होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षपदी रांगी चे माजी उपसरपंच नरेंद्र भुरसे हे होते तर उद्घाटक म्हणून केशवजी मेश्राम, प्रमुख अतिथी रामदासजी वासेकर, वासुदेव सहारे, आनंदरावजी बर्डे, डॉ.विनोबा रामटेके, भगवान खोब्रागडे, मुळे मॅडम सचिव गटग्रामपंचायत निमनवाडा, लालाजी खोब्रागडे, तुलसीदास कुकडकार, विठ्ठल चापडे, भोलेनाथ चापडे, जगन्नाथ राजगडे, हिराजी कुकडकर, हेमराज चापडे, प्रमोद बोबाटे, यदुनाथ चापडे, उपसरपंच चेतन सुरपाम, पठाण बाबु आदि मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे संचालन राजेंद्र सहारे यांनी केले तर आभार तेली समाज अध्यक्ष शशिकांत वासेकर यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी नीताताई कुकडकर, विशाखा मोंगरकर, वंदना चापडे, भाग्यश्री कुकडकर, सुषमा जुवारे, सुवर्णा भुरसे, सरिता चापडे, दीक्षा जानेपरिवार यांचेसह संपूर्ण तेली समाज सेवा महासंघ निमगाव, व गावकरी उपस्थित होते.

(The Gadvishva) (Gadchiroli News Updates)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here