The गडविश्व
गडचिरोली, १० एप्रिल : दारूच्या व्यसनापासून त्रस्त झालेल्या रुग्णांसाठी तालुकास्थळी उपचाराची सोय उपलब्ध व्हावी, यासाठी मुक्तीपथ तर्फे तालुका क्लिनिक सुरू आहेत. या क्लिनिकतून एकूण २९ रुग्णांनी उपचार घेत व्यसनातून मुक्त होण्याचा निर्धार केला आहे.
दारूचे व्यसन सोडण्याची इच्छा असलेल्या रुग्णांना वेळेवर उपचार मिळावे, यासाठी जिल्हाभरातील बाराही तालुक्यातील मुक्तीपथच्या तालुका कार्यालयात व्यसन उपचार क्लिनिक सुरू करण्यात आले आहे. नियोजित दिवशी आयोजित क्लिनिकला भेट दिलेल्या रुग्णांना तज्ञांकडून समुपदेशन व उपचार केले जाते. या माध्यमातून आतापर्यंत अनेकांनी उपचार घेऊन दारूच्या व्यसनातून मुक्त झाले आहेत. मागील आठवड्यात धानोरा ५, देसाईगंज १०, चामोर्शी ६ व अहेरी येथील क्लिनिकतून ८ रुग्णांनी पूर्ण उपचार घेतला.