– धानोरा तालुक्यात दोन गावांत वंधत्व निवारण शिबिर यशस्वी
The गडविश्व
ता.प्र / धानोरा, दि. ०७ : धानोरा तालुक्यातील पशुवैद्यकीय दवाखाना चातगाव यांच्या पुढाकारातून वंधत्व निवारण पंधरवडा अभियानांतर्गत दोन गावांमध्ये वंधत्व निवारण शिबिरांचे यशस्वी आयोजन करण्यात आले. ग्रामीण भागातील सुमारे २० टक्के जनावरे वंधत्वग्रस्त असून त्यामुळे दूध उत्पादन घटले असून भाकड जनावरांची संख्या वाढली आहे. या समस्येवर मात करून पशुधनाची अनुवंशिक सुधारणा आणि उत्पादनक्षमता वाढविण्याच्या उद्देशाने हे अभियान राबविण्यात आले.
शिबिरादरम्यान एकूण १५ गायींवर वंधत्व निवारण उपचार, १२ जनावरांचे खच्चीकरण, २० जनावरांची गर्भधारणा तपासणी तसेच ५० जनावरांचे जंत निर्मूलन करण्यात आले. या उपक्रमामुळे शेतकरी व पशुपालकांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.
सदर शिबिराचे आयोजन डॉ. स्वप्नील उंदीरवाडे, पशुधन विकास अधिकारी यांनी केले असून शिबिरे यशस्वीपणे पार पाडण्यासाठी अनिल नेटिनकर, पशुधन पर्यवेक्षक आणि हेमंत कोडाप यांचे विशेष योगदान लाभले.
#thegdv #thegadvishva #Gadchiroli #Dhanora #PashuvaidyakiyShibir #AnimalHusbandry #RuralDevelopment














