छत्तीसगडच्या दोन जहाल नक्षलींचे गडचिरोली पोलीसांसमोर आत्मसमर्पण

1756

– दोघांवर आठ लाख रूपयांचे बक्षीस होते जाहिर
The गडविश्व
गडचिरोली, 24 जुलै: गडचिरोली पोलीस दलामार्फत राबविण्यात येणाऱ्या आत्मसमर्पण योजने अंतर्गत छत्तीगडच्या दोन जहाल नक्षल्यांनी गडचिरोली पोलीस दलासमोर सोमवार 24 जुलै रोजी आत्मसमर्पण केले. अडमा जोगा मडावी, (26) रा. जिलोगगडा, पो. पामेड ता. उसुर जि.बिजापूर छत्तीसगड व टुगे कारू वड्डे (35) रा. कवंडे, पो. बेद्रे ता. बैरामगड जि. बिलापूर छत्तीसगड असे आत्मसमर्पीत नक्षल्यांची नावे आहे. 28 जुलै नक्षल सप्ताहाच्या पार्श्वभुमीवर गडचिरोली पोलीस दलाची ही यशस्वी कामगीरी मानल्या जात आहे.
28 जुलै ते 3 ऑगस्ट दरम्यान नक्षली हे नक्षल शहिद सप्ताह पाळत असतात. या सप्ताहामध्ये सरकारी मालमत्तेचे नुकसान करणे, सुरक्षा दलांवर हल्ले करणे, खबरी असल्याच्या संशायातुन निष्पापांच्या हत्या करणे, रस्ते बंद करणे आदी हिंसक कारवाया करत असतात. शासनाने जाहिर केलेली आत्मसमर्पण योजना, वर्षभरात विविध चकमकीत माओवादयांचा झालेला खात्मा तसचे हिंसाचाराच्या जीवनाला कंटाळुन वरिष्ठ माओवादयांसह अनेक जहाल माओवादयांनी आजपर्यंत आत्मसमर्पण केले आहे. आज आत्मसमर्पण केलेल्या या जहाल नक्षलीवर एकुण आठ लाख रूपयांचे बक्षीस होते.

 

दरम्यान आत्मसमर्पीत नक्षली अडमा जोगा मडावी हा जुलै 2014 ला पामेड एलजीएसमध्ये सदस्य पदावर भरती होवून 2021 पर्यंत कार्यरत होता. 2021 ला झोन ॲक्शन टीममध्ये बदली होवून कार्यरत राहून जुन 2023 ला दलम सोडून घरी परत आला. याच्यावर 8 चकमक, 5 खुन, 1 जाळपोळ व इतर 2 गन्हयात सहभाग होता. 2016 मधील बोटेतोंड, 2017 बुरकापल जगंल परिसर चकमक त्यात 25 जवान शहीद , चिन्ना बोडकेल जंगल परिसर चकमक यात दोन जवान शहीद व 5 जवान जखमी, 2018 मध्ये मुरडोंडा रोडवर झालेल्या भुसुरूंग स्फोट यात पोलीस पार्टीचे 2 जवान शहीद व 5 जवान जखमी, 2018 मध्ये झारापल्ली जंगल परिसर चकमक त्यामध्ये पोलीस पार्टीचे 3 जवान शहीद 7 जवान जखमी व कोंडास्वाल रोडवर चकमक यात 1 जवान शहीद, तसेच 2020 मध्ये एर्रान जंगल परिसरातील चकमक त्यात 2 जवान शहीद व 7 जवान जखमी, मिनपा चकमकीत पोलीस पार्टीच 17 जवान शहीद व 20 जवान जखमी झाले होते इत्यादी चकमकीत त्याचा सहभाग होता. तर 2018 मधील झारा (कुतुल एरिया), 2020 मध्ये गुमगुडेम व गोंडभटुम, कोमाट तसेच २०२३ झारा (नेलनार) येथील प्रत्येकी एका इसमाच्या खुनात तो प्रत्यक्षरित्या सहभागी होता. 2022 मध्ये झोरी येथील रोड कामावरील 2 (1 ट्रक व 1 टेम्पो) वाहनांची जाळपोळ, 2015 मध्ये पामेड पासुन तेलंगणाकडे जाणा­ऱ्या रोडवर तसेच सन 2023 मध्ये ओरच्छा ते धनोरा (छ.ग.) रोडवर खोदकाम करण्यात त्याचा सहभाग होता. त्याच्यावर शासनाने 6 लाख रूपयाचे बक्षीस जाहिर केले होते. आत्मसमर्पणानंतर पुनर्वसनाकरीता केंद्र व राज्य शासनाकडुन एकुण 4 लाख 50 हजार रुपये बक्षीस जाहिर केले आहे.

त्याने दलममधील वरिष्ठ कॅडरचे माओवादी सांगतात की, चळवळीकरीता/जनतेकरीता पैसे गोळा करावे लागतात. प्रत्यक्षात गोळा केलेला पैसा ते स्वत:साठीच वापरतात. जनतेच्या विकासासाठी कधीच वापरले जात नाही, वरीष्ठ माओवादी नेते फक्त स्वत:च्या फायद्यासाठी गरीब आदिवासी युवक-युवतींचा वापर करून घेतात, दलममध्ये असतांना विवाह झाले तरीही वैवाहीक स्वतंत्र आयुष्य जगता येत नाही, पोलीस दलाच्या सततच्या नक्षलविरोधी अभियानामुळे जंगलातील वावर धोकादायक झाले आहे, खबरी असल्याच्या फक्त संशयावरून आमच्याच बांधवांना ठार मारायला सांगतात, नक्षल दलममध्ये अहोरात्र भटकंतीचे जीवन असून सुध्दा स्वत:च्या आरोग्याविषयी समस्या उद्भवल्यास त्याकडे काळजीपुर्वक लक्ष दिल्या जात नाही या कारणामुळे आत्मसमर्पण करीत असल्याचे सांगितले.

टुगे कारु वड्डे हा 2012 ला जाटलुर दलम जनमिलीशीय सदस्य पदावर भरती होऊन सन 2023 पर्यंत कार्यरत राहुन घरी परत आला होता. त्याने या कार्यकाळात 6 खुन त्यात 2020 मधील नंगुर व कवंडे येथील 02 इसम, 2021 मधील झारामरका येथील 1 इसम, परकेली येथील 1 इसम व कवंडे येथील 1 इसम तसेच सन 2022 मधील नंगूर येथील 1 इसम अशा 06 निरपराध इसमांच्या खुनात त्याचा प्रत्यक्षरित्या सहभाग होता. तर 2022 मध्ये ईरपनार (म.रा.) येथील रोड कामावरील 12 (ट्रॅक्टर, जेसीबी) वाहनांची जाळपोळ करण्यात त्याचा सहभाग होता. त्याने शासनाने राबविलेल्या विविध कल्याणकारी योजनांमुळे जनतेचा नक्षलवाद्यांना पाठिंबा मिळत नाही, वरिष्ठ कॅडरचे माओवादी सर्व जमा केलेला पैसा स्वत:च्या उन्नतीसाठी वापरतात व कनिष्ठ माओवाद्यांना गरजेपुरताही पैसा दिला जात नाही, छत्तीसगड, महाराष्ट्र मधील नक्षलवाद्यांना वरच्या पदापर्यंत जाण्याची संधी मिळत नाही, महाराष्ट्र शासनाने जाहीर केलेल्या आत्मसमर्पण योजनेने प्रभावीत झाल्यामुळे आत्मसमर्पण करीत असल्याचे सांगितले. त्याच्यावर शासनाने 2 लाख रूपयाचे बक्षीस जाहीर केले होते. आत्मसमर्पणानंतर पुनर्वसनाकरीता केंद्र व राज्य शासनाकडुन एकुण 4 लाख रुपये बक्षीस जाहिर केले आहे.

माओवादी जसे सांगत आले की, आमचा लढा हा जनतेसाठी आहे, तो कधी जनतेसाठी नव्हताच. सप्ताहाच्या नावाखाली गरीब आदिवासींची पिळवणूक करणे, ठेकेदारांकडुन खंडणी गोळा करणे, वर्चस्व गाजवणे, देशविघातक कृत्य करणे यासाठीच फक्त त्यांचा लढा आहे. त्यामुळे गडचिरोली पोलीस दल सर्व जनतेला आवाहन करते की, माओवाद्यांच्या खोट्या व फसव्या तथाकथीत क्रांतीला बळी पडू नये. गडचिरोली पोलीस दलाने अतिशय प्रभावीपणे नक्षलविरोधी अभियान राबविल्यामुळे तसेच शासनाने नक्षलवाद्यांना आत्मसमर्पणाची सुवर्णसंधी उपलब्ध करून दिल्याने, सन्मानाने जीवन जगण्यासाठी सन 2022 ते 2023 सालामध्ये आतापर्यंत एकुण 12 जहाल माओवाद्यांनी आत्मसमर्पण केले आहे. विकासकामांना आडकाठी निर्माण करणा­या नक्षलवाद्यांवर पोलीस दल सक्षमपणे कारवाई करण्यास तत्पर असुन, जे माओवादी विकासाच्या प्रवाहात सामील होण्यास ईच्छुक असतील त्यांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी तसेच लोकशाहीतील सन्मानाचे जीवन जगण्यासाठी गडचिरोली पोलीस दल सर्वतोपरी मदत करेल, तसेच त्यांनी हिंसेचा त्याग करुन शांततेचा मार्ग स्विकारावा असे आवाहन पोलीस अधीक्षक गडचिरोली नीलोत्पल सा. यांनी केले आहे.

(the gdv, the gadvishva, gadchiroli police nxal, gadchiroli news, sp nilotpal, Two Jahal Naxalites of Chhattigarh surrendered before Gadchiroli Police)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here