धानोऱ्यातील युवक आक्रमक ; जिम सुरू करण्यासह स्वच्छतागृह उभारण्याची मागणी

6

धानोऱ्यातील युवक आक्रमक ; जिम सुरू करण्यासह स्वच्छतागृह उभारण्याची मागणी
The गडविश्व
ता. प्र/धानोरा, दि. १३ : शहरातील युवकांसाठी जिम सुरू करावी आणि मुख्य चौकात सार्वजनिक स्वच्छतागृह उभारावे, या मागण्यांसाठी धानोरा येथील युवकांनी नगरपंचायतीच्या मुख्याधिकाऱ्यांना निवेदन दिले. १२ ऑक्टोबर रोजी तरुण युवा संघटनेच्या नेतृत्वात हे निवेदन देऊन शहरातील महत्त्वाच्या समस्यांकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यात आले.
शहरातील युवकांना व्यायामासाठी योग्य सुविधा उपलब्ध व्हावी, यासाठी बंद असलेली किंवा प्रस्तावित जिम सुरू करण्यात यावी, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली. तसेच शहरातील मुख्य चौकात सार्वजनिक स्वच्छतागृह उभारून नागरिकांची गैरसोय दूर करावी, अशी मागणीही युवकांनी केली.
युवकांचे आरोग्य, व्यायामाच्या सुविधा आणि सार्वजनिक स्वच्छतेचा प्रश्न लक्षात घेता नगरपंचायतीने या मागण्यांची तातडीने दखल घ्यावी. नागरिकांच्या मूलभूत गरजा पूर्ण करण्यासाठी प्रशासनाने प्रत्यक्ष कार्यवाही करावी, अशी अपेक्षा युवकांनी व्यक्त केली.
यावेळी वंश इंदूरकर, जुबेर शेख, दीपक भूषणवार, यश भेंडारे, हिमांशू मडावी, शिरीष सहारे, नकुल बोरीकर, शाहरुख सय्यद, सौरव सहारे, सचिन गावतुरे, निल गोपले, प्रशांजित मलिक, बिराज मालकार, विशाल मालकार, यथार्थ शेंडे, कुणाल मशाखेत्री, प्रताप बिश्वास, प्रणय शेंडे, शोयेब सय्यद, रियाज शेख, अवी सहारे, ऋषभ रडके, पुरुषोत्तम चिंचोरकर, गोपी सावरकर, फिरोज सय्यद यांच्यासह अन्य युवक उपस्थित होते.
#thegdv #thegadvishva #gadchirolinews #gadchirolipolice #Dhanora #Gadchiroli #YouthIssues #GymFacility #PublicToilet #TheGadvishva

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here