धक्कादायक! सोनसरी आश्रमशाळेत विद्यार्थिनीची गळफास घेऊन आत्महत्या

51

धक्कादायक! सोनसरी आश्रमशाळेत विद्यार्थिनीची गळफास घेऊन आत्महत्या
– कुरखेडा तालुक्यात खळबळ
The गडविश्व
ता.प्र/कुरखेडा, दि. १२ : गडचिरोली जिल्ह्यातील कुरखेडा तालुक्यात असलेल्या सोनसरी येथील आश्रमशाळेत एका विद्यार्थिनीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना सोमवारी (१२ ऑक्टोबर) उघडकीस आली. रानू कृष्णा हलामी (रा. मोहगाव) असे मृत विद्यार्थिनीचे नाव असून, या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
घटनेची माहिती मिळताच कुरखेडा पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून, पुढील तपास आणि कायदेशीर कारवाई सुरू आहे. मात्र, विद्यार्थिनीने आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल का उचलले, याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.
दरम्यान, या घटनेमुळे आश्रमशाळांमधील विद्यार्थ्यांची सुरक्षितता आणि त्यांच्या देखरेखीचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. या प्रकरणात तपासातून नेमकी कोणती माहिती समोर येते, याकडे लक्ष लागले आहे.
या घटनेतील मृत विद्यार्थिनीच्या आत्महत्येमागील कारण याबाबत वृत्त लिहीपर्यंत अधिकृत माहिती प्राप्त झाली नव्हती.
#thegdv #thegadvishva #gadchirolinews #gadchirolipolice #crimenews #breakingnews #kurkhedanews

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here