– दोन महिन्यांपासुन अंधार
The गडविश्व
ता.प्र / धानोरा, २५ जुलै : तालुक्यातील रांगी ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या गावातील विद्युत खांबावर मागील दोन महिन्यांपासून पथदिवे नसल्याने पावसाळ्याच्या दिवसात रात्रीच्या वेळी अंधार पसरलेला असतो.
धानोरा तालुक्यातील रांगी ग्रामपंचायत मोठी असुन परिसराची बाजारपेठ म्हणून ओळखली जाते. परिसरातील लोक दररोज या ना त्या कामासाठी रांगी गावाला येतच असतात.भर पावसाळ्याच्या दिवसात गावातील अनेक खांबाचे दिवे नाममात्र विद्युत पोलवर लटकलेली दिसतात. तर काही खांबाना दिव्यांचा पत्ताच लागत नाही. त्यामुळे रात्री विद्युत लाईटा अभावी अंधार पसरलेला असतो. पावसाळ्याच्या दिवसात गावातील नागरिकांना साप, विचुं चावल्यास जबाबदार कोण? गावात फिरताना उजेड आवश्यक आहे. कोणताही अनुचित प्रकार घडल्यास जबाबदार कोण असा प्रश्न गावकरी विचारीत आहेत. पावसाळ्या पुर्वी लाईट लावने अपेक्षित असताना सूद्धा लावले गेले नाहीत. तरी ग्रामपंचायत प्रशासनाने वेळीच दखल घेऊन पथदिवे लावण्याची मागणी गावकऱ्यांनी केली आहे.