– कठोर शिक्षा करण्याची केली मागणी
The गडविश्व
ता.प्र / कुरखेडा, २५ जुलै : मणिपूर राज्यात आदिवासी महिलावर सामुहिक अत्याचार तसेच सांगली जिल्ह्यातील बेडग येथे महापुरुषाच्या नावाची कमान तोडणाऱ्या आरोपींना कठोर शिक्षा करण्यात यावी या मागणी करीता सोमवार २४ जुलै रोजी येथील किसान सभागृहापासून अनूसूचित जाती जमाती संघटनेच्या वतीने मोर्चा काढत व निषेधाच्या घोषणा देत तहसील कार्यालयावर धडक देण्यात आली व तहसीलदार यांच्यामार्फत राष्ट्रपती यांना निवेदन पाठविण्यात आले.
मणिपूर राज्यात आदिवासी कूकी समाजावर अन्याय अत्याचार सूरू आहे. अनेकांची हत्या करण्यात आली आहे. अनेकाना आपले घरदार सोडावे लागले, तिन आदिवासी महिलांना समाजकंटकानी नग्न करीत त्यांची धिंड काढली व कौर्याची सिमा ओलांडत सामुहिक बलात्कार केला या आरोपीना फाशीची शिक्षा देण्यात यावी या मागणी सह बेडग येथे महापुरुषाच्या नावाची कमान तोडणाऱ्या व मध्यप्रदेशात आदिवासी इसमावर लघूशंका करणाऱ्यांना कठोर शिक्षा करण्यात यावी या करीता स्थानिक समस्त आदिवासी समाज संघटणा व दलित समाज संघटनेच्या वतीने निषेध मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. या समाजकंटकाना शह देणाऱ्या राज्यकर्त्यांच्याही यावेळी घोषणाबाजी करीत निषेध करण्यात आला.
मोर्चात कुरखेडा येथील माजी नगराध्यक्ष आशाताई तुलावी, सभापती कुंदाताई तितीरमारे, नगरसेवीका हेमलता नंदेश्वर, नगरसेवीका कांताबाई मठ्ठे, पार्वता ताराम, पिरीपा जिल्हाध्यक्ष मुनिश्वर बोरकर, माजी जि.प. सदस्य प्रभाकर तुलावी, माजी जि.प. सदस्य नाजूक पूराम, माजी प.स. सभापती गिरीधर तितराम, माजी उपसभापती श्रीराम दूगा, माजी सदस्य धर्मदास उईके, जिग्नेश वरखेडे, नगरसेवक अशोक कंगाले, पिरीपा जिल्हाकार्याध्यक्ष मुरलीधर भानारकर, युवा शाखा अध्यक्ष संतोष खोबरागड़े, मुकेश खोबरागड़े, गोविन्द टेकाम, संजय कोकोडे, महादेव तूलावी, रामाजी किरंगे, मनोज सिडाम, भोजराज आत्राम, अनिल उईके, काशीराम पोटावी यांच्यासह मोठ्या संख्येत अनूसूचित जाति जमाती संघटनेचे नागरिक सहभागी झाले होते.