गडचिरोली : रस्त्यालगत आढळले जिवंत अर्भक

2121

 आरोपीचा शोध सुरु
The गडविश्व
गडचिरोली, दि. २२ : जिल्हा मुख्यालयापासून जवळच असलेल्या खरपूंडी येथे रस्त्यालगत जिवंत अर्भक आढळून आल्याची घटना २१ ऑक्टोबर रोजी सकाळी १०. ३० ते ११. ३० वाजताच्या सुमारास उघडकीस आली. सदर घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली असून अशाप्रकारचे कृत्य करणाऱ्या आरोपीचा शोध घेण्यात येत आहे.
प्रतप्त माहितीनुसार, गडचिरोली तालुक्यातील खरपुंडी ते आकरटोली कडे जाणाऱ्या रस्त्याच्या बाजुला असलेल्या कचऱ्यामध्ये अज्ञात व्यक्तीने आपले पाप लपविण्यासाठी पुरुष जातीचे अर्भक टाकुण दिले. मात्र सदर अर्भक रस्त्याने जाणाऱ्या नागरिकांना निदर्शनास येताच याबाबत पोलिसांना माहिती देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळ गाठून अर्भक ताब्यात घेत महिला व बाल रुग्णालय येथे दाखल केले. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सदर अर्भक जिवंत असल्याचे सांगितले. आरोपीने सदर अर्भक हे मृत्यू घडवून आणण्याच्या उद्देशाने व जन्म देऊन आपले असले कृत्य लपविण्यासाठी केल्यादे दिसून येत असून याबाबत अज्ञात व्यक्ती विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदर घटनेने गावामध्ये तीव्र संताप व्यक्त करण्यात येत असून आरोपीस कायदेशीर शिक्षा देण्यात यावी अशी मागणी जोर धरत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here